पुणे तिथे काय उणे हे उगाच म्हणत नाहीत. पुणेकर कधी काय करतील याचा काय नेम नाय. पुणे आणि पुणेरी पाट्यांबद्दल तर तुम्ही ऐकलेच असेल. पुण्याची लोक काहीशी वेगळीच. त्यांच्यातील खट्याळपणा हा संपूर्ण जगप्रसिद्ध आहे. सध्या असाच पुण्याचा एक मिश्किल व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका पुणेरी तरुणाचा असून या व्हिडिओतील कृत्य बघून तुम्हाला थक्क आणि हसू दोन्ही अनावर होईल.
काय आहे व्हिडिओत
पावसाळा सीजन सुरु झाला असून काही जागी पावसाने आपली हजेरी लावली आहे. उन्हाळयाच्या या उष्ण वातावरणातून सुटका मिळावी म्हणून अनेक लोक पावसाची वाट पाहत आहेत. तसेच ज्या जागी पाऊस पडला त्याजागी अनेक लोक या पावसाची मजा घेताना दिसत आहे. सध्या असाच पावसाचा आनंद लुटणाऱ्या एका तरुणाचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे, हा तरुण भरपावसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात झोपून खेळताना दिसून येत आहे.
हा व्हिडिओ पुण्याचा असून अनेकांना या तरुणाच्या,मिश्किल कृत्याकडे बघून हसू अनावर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा परिसरातील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रस्त्यावर [पाणी साचलेले असताना या पाण्यात मॅट टाकून झोपलेला आहे. यात वाहत्या पाण्याबरोबरच मॅटही वाहताना दिसत आहे आणि या मॅटवर बसून तरुण छान मज्जा घेत आहे आणि पावसाचा आनंद घेत हा तरुण छान एन्जॉय करताना दिसत आहे. हा असा आनंद मुळातच कोणी साजरा केला असावा.
[read_also content=”आभाळामध्ये सजलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र, AI फोटो व्हायरल https://www.navarashtra.com/viral/shivaji-maharaj-image-in-clouds-photo-viral-543847/”]
सदर व्हायरल व्हिडिओ @mipunekar.in या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कशी वाटली भावाची शक्कल?” अनेकांनी या व्हिडिओची मजा घेत याच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “एकाने उजरने लिहिले आहे, मन जिंकलस भावा, डोळ्याचं पारणं फिटलं रे” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, ”भावा जरा सांभाळून, तसाच गटारामध्ये जाशील”.