AI च्या मदतीने तरूणाने तयार केला नोकरीचा अर्ज
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा अशा गोष्टी समोर येतात ज्या पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर अनेकदा इतके मनोरंजक गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून आपले हसू आवरता येत नाही. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका तरूणाने असे काही जॉब ॲप्लिकेशन तयार केले आहे की, वाचून मुलाखत घेणारा हैराण झाला आहे.
हे जॉब ॲप्लिकेशन पोस्ट केल्यानंतर वाचून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. अलीकडे AI खूप वेगाने विकसित होत आहे. लोक अनेक कामांसाठी AI ची मदत घेत आहेत. अनेेक लोक AI च्या मदतीने मेलिंग, सीव्ही तयार करण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीचे अर्ज पाठवत आहेत. एका तरूणाने देखील AI ची मदत घेऊन सीव्ही तयार केला आणि नोकरीचा अर्ज एका कंपनीला. पण ते वाचल्यानंतर कंपनीच्या सीईओने स्वत: ते सोशल मीडियावर पोस्ट केला. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही पोस्ट व्हायरल होण्यमागचे कारण म्हणजे, या तरूणाने एक मोठी चुक केली आहे. जेव्हा आपण AI च्या मदतीने अर्ज तयार करतो. त्यावेळे AI आपल्याला संपूर्ण अर्ज आपल्या तयार करून देत नाही. तर अर्ज कसा असा पाहिजे याची एक प्रतिकृती देतो. AI आपल्याला काही महिती देतो आणि काही भाग रिकामा सोडतो जिथे आपण आपली कौशल्ये अनुभव यासारख्या गोष्टी भरतो. आपण AI ची मदत घेऊन आपला सीव्ही तयाार करू शकतो. परंतु एका व्यक्तीने AI ने दिलेली माहिती न वाचता त्यामध्ये बदल न करता कंपनीला पाठवली.
व्हायरल पोस्ट
Just received yet another job application. No wonder we have so much unemployment today :’) pic.twitter.com/c0VaGWYrIJ
— Ananya Narang (@AnanyaNarang_) October 15, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnanyaNarang_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आत्ताच दुसरा नोकरीचा अर्ज आला आहे. आज आपल्याकडे इतकी बेरोजगारी आहे यात आश्चर्य नाही.’ याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, त्याने कंपनीला तुम्ही काय भरायचे ते भरा असे सांगितले आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अरे देवा, कॉपी करण्यासाठी बुद्धीचीही गरज असते. आणखी एका यूजरने लिहिले आह की, काय विनोद आहे भाऊ.