इजिप्तमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. इजिप्तमधील उत्तर डकहलिया प्रांतातील मिस्रमध्ये बस कालव्यात कोसळून भीषण अपघात (Egypt Bus Accident) झाला आहे. या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
[read_also content=”थायलंडमधील फूड ब्लॉगर महिलेंने वटवाघळाचं सूप पिल्याने झाली अटक; ‘हा’ व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल https://www.navarashtra.com/viral/thai-food-blogger-arrested-for-drinking-bat-soup-this-video-is-going-viral-on-social-media-nrrd-344181.html”]
इजिप्तमध्ये प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याची दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस डकाहलियाच्या उत्तरेकडील गव्हर्नरेटमधील आगा शहरात जात होती. या दरम्यान ही बस शनिवारी महामार्गावरुन जाताना कालव्यात पडली. या बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते. यापैकी 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण यामध्ये जखमी झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी 18 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
[read_also content=”आचार्य प्रमोद यांनी दिले राजस्थानमध्ये CM बदलाचे संकेत https://www.navarashtra.com/india/rajasthan-congress-cm-face-priyanka-gandhi-close-aide-acharya-pramod-krishnam-344139.html”]