Amir Hamza : 'यमदूत आला अन् गेम करून गेला', हाफिज सईदचा 'उजवा हात' लाहोरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Amir Hamza Lashkar-e-Taiba killed : पाकिस्तानच्या लाहोरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताविरुद्ध सतत विष ओकणारा आणि लश्कर-ए-तोयबाचा (LeT) संस्थापक सदस्य अमीर हमजा (Amir Hamza) याला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. लाहोरमधील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमजाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अमीर हमजा हा केवळ एक दहशतवादी नव्हता, तर तो लश्कर-ए-तोयबाचा मुख्य विचारवंत (Ideologue) मानला जात असे. हाफिज सईदसोबत मिळून त्याने या संघटनेची स्थापना केली होती. तो लश्करच्या प्रकाशनांचा प्रमुख होता आणि आपल्या भडकावू भाषणांनी तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यात त्याचा मोठा हात होता. २०१२ मध्ये अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. भारताविरुद्ध काश्मीरमध्ये झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांच्या मागे हमजाचा मेंदू होता, असे भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sicily Base : ‘धैर्यहीन नेत्या!’ ट्रम्प आणि मेलोनींची ‘केमिस्ट्री’ बिघडली; इटलीच्या ‘या’ एका निर्णयाने अमेरिका संतापली
हा हल्ला इतका नियोजनबद्ध होता की हल्लेखोरांनी हमजाला निसटण्याची कोणतीही संधी दिली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले असून, पंजाब पोलिसांनी संपूर्ण भागाची नाकेबंदी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या पद्धतीने हा हल्ला करण्यात आला आहे, ते पाहता पाकिस्तानात सुरू असलेले ‘अज्ञात हल्लेखोरांचे’ सत्र अधिकच तीव्र झाल्याचे दिसते. यापूर्वीही परमजीत सिंग पंजवड, शाहिद लतीफ आणि मुल्ला बहराम यांसारख्या भारतविरोधी दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे पाकिस्तानात काटा काढण्यात आला आहे.
🚨🔴𝐋𝐚𝐝𝐢𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐠𝐞𝐧𝐭𝐥𝐞𝐦𝐞𝐧, 𝐲𝐨𝐮 𝐚𝐫𝐞 𝐬𝐭𝐢𝐥𝐥 𝐧𝐨𝐭 𝐫𝐞𝐚𝐝𝐲 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐢𝐬..
Unknown Gunmen carried out a targeted attack in Johar Town, Lahore.
LeT commander Amir Hamza was shot by unidentified assailants earlier today…🧵🧵 pic.twitter.com/Qza51Sh8ju — THE UNKNOWN MAN (@Theunk5555) April 16, 2026
credit – social media and Twitter
अमीर हमजा हा भारतीय लष्करावर आणि काश्मीरमधील नागरिकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार होता. लश्करच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य म्हणून तो संघटनेसाठी निधी जमा करणे आणि नव्या दहशतवाद्यांची भरती करणे ही कामे पाहत असे. त्याच्या मृत्यूमुळे लश्कर-ए-तोयबाच्या पायाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानात सुरक्षित वावरणाऱ्या या दहशतवाद्यांना आता स्वतःच्या घरातच मृत्यूची भीती सतावत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज
अमीर हमजावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने हमजाला ठेवलेल्या रुग्णालयाची सुरक्षा कडक केली आहे. या ‘टार्गेट किलिंग’मागे कोणाचा हात आहे, याचा तपास पाकिस्तानी यंत्रणा करत आहेत. मात्र, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पाकिस्तान आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Ans: अमीर हमजा हा लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा अत्यंत जवळचा सहकारी होता.
Ans: पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी हमजावर गोळीबार केला.
Ans: हमजा भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये, विशेषतः काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये आणि दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेत सक्रिय होता.






