
At least 66 killed in the Philippines as Kalmaegi storm wreaks havoc
Philippines Kalmaegi Storm : मनिला : फेंगशेन वादळानंतर आता कालमेगी वादळाने फिलिपिन्समध्ये कहर माजवला आहे. या वादळाने ६६ जणांचा बळी घेतला आहे, तर २६ जण अजूनही बेपत्ता आहेत. अनेकांचा पूरात वाहून मृत्यू झाला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालमेगीमुळे फिलिपिन्समध्ये मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहे. यादरम्यान ६ मदत सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यापूर्वी भूकंप आणि फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. त्यातून सावरत असतानाचा या नव्या वादळाने विध्वंस घडवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, फिलिपिन्सच्या दक्षिण अगुसान डेल सुर प्रांतात वादळामुळे एक हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर लोकांना मदत पोहोचवण्यासाठी रवाना झाले होते, परंतु वादळामुळे विमान कोसळले असून विमानातील सहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे अछानक पूर आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळी वाढल्या आहेत.
तसेच भूस्खलनामुळेही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पुरामुळे निवासी भाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर चढले आहेत. सध्या रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. परंतु धोका वाढत असल्याने आपत्कालीन कर्मताऱ्यांना पाण्याची पातळी कमी होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सध्या परिस्थिती बिकट होत चालली असून सेबूत्या गव्हर्नर पामेला बारिकुत्रो यांनी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. पण अचानक पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिघडली आहे. सर्वात जास्त प्रभाव सेबू प्रांतात झाला आहे. आतापर्यंत ७९ लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर हजारो लोक स्थलांतरित झाले आहे.
कालमेगी वादळापूर्वी फिलिपिन्समध्ये ऑक्टोबरमध्ये ( दि. २०) फेंगशेन वादळाने कहर माजवला होता. या वादळाने ७ जणांचा बळी घेतला होता. तसेच १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले होते. याशिवाय फेंगशेन वादळाच्या काही आठवड्यांपूर्वी ३० सप्टेंबर रोजी फिलिपिन्समध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. तर त्या आधी बुआलोई वादळाने कहर माजवला होता.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. फिलिपिन्समध्ये पुन्हा कोणती नैसर्गिक आपत्ती आली आहे?
फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळानंतर कालमेगी वादळाने कहर माजवला आहे.
प्रश्न २. फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने किती जणांचा बळी घेतला?
फिलिपिन्समध्ये कालमेगी वादळाने ६६ जणांचा बळी घेतला आहे, तर २६ जण अजूनही बेपत्ता आहेत.