Bangladesh News : बांगलादेशात राजकीय संघर्षाचा भडका; सत्ताधारी आणि शेख हसीना समर्थकांमध्ये हिंसक चकमक, दोघांचा मृत्यू

बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यात सत्ताधारी BNP आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग समर्थकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या चकमकीत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वाहनांची जाळपोळ आणि हिंसाचारामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Bangladesh political workers fightफोटो सौजन्य सोशल मीडिया
Published on: 
Updated on: 
  • दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष; दोघांचा मृत्यू

  • शेख हसीना यांच्या समर्थकांकडून आंदोलन

  • वाहनांची जाळपोळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Bangladesh News : बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सत्ताधारी पक्षाचे समर्थक आणि पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष; दोघांचा मृत्यू

बांगलादेशातील शरियतपूर जिल्ह्यात सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि माजी सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. पद्मा पुलाजवळील परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले.

यावेळी झालेल्या चकमकीत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक नागरिक जखमी झाले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. संघर्षादरम्यान दगडफेक, गोळीबार आणि स्फोटकांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

फोटो सौजन्य सोशल मीडिया
India Denmark : भारत आणि डेन्मार्कची महास्ट्रॅटेजिक युती; संरक्षण, AI अन् हरित ऊर्जेत मोठी झेप, भारतीयांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

शेख हसीना यांच्या समर्थकांकडून आंदोलन


पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या राजकीय हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांकडून पक्षावरील बंदी उठवण्याची आणि राजकीय कारवाई थांबवण्याची मागणी केली जात आहे.

शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये भारतातून बांगलादेशात परतण्याचा निर्धार व्यक्त केल्याने समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण आणखी संवेदनशील बनले आहे.

फोटो सौजन्य सोशल मीडिया
Myanmar News : म्यानमारमध्ये लष्कराचे भीषण हल्ले; रखाइन आणि काया राज्यांत ४९ जणांचा मृत्यू, ९० हून अधिक जखमी

वाहनांची जाळपोळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

संघर्षादरम्यान काही ठिकाणी मोटारसायकली, दुकाने आणि रस्त्यालगतच्या व्यावसायिक आस्थापनांना आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असून संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली.

दरम्यान, बांगलादेशात सत्ताधारी पक्ष आणि अवामी लीग समर्थकांमधील संघर्ष वाढत असल्याने आगामी काळात राजकीय परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.