Donald Trump: इराणी राजकारण अन् 'मोहम्मद' नाव! डोनाल्ड ट्रम्प यांची जिभ पुन्हा घसरली; मुस्लिम समुदाय आणि मानवाधिकार संघटना आक्रमक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांनी राजकीय वर्तुळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या वादाला तोंड फोडले आहे. जॉर्जिया राज्यातील डाल्टन म्युनिसिपल विमानतळावरील एका हँगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी मुस्लिम समाजात अत्यंत आदरणीय असलेल्या ‘मोहम्मद’ या नावावरून उपरोधिक आणि वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेतील मुस्लिम संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका करण्यास सुरुवात केली आहे.
रॅलीतील उपस्थितांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “जर तुम्हाला मध्यपूर्वेतील (Middle East) एखाद्या व्यक्तीच्या नावाविषयी शंका असेल किंवा तिचे नाव काय आहे हे माहीत नसेल, तर तुम्ही तिला सहज ‘मोहम्मद’ म्हणून हाक मारू शकता. हे नाव बरोबर निघण्याची शक्यता सुमारे ६५ टक्के असते.” इतकेच नव्हे तर, ते पुढे म्हणाले की ते गेल्या अनेक वर्षांपासून हेच करत आले आहेत आणि यात त्यांचे अंदाज कधीही चुकलेले नाहीत. मुस्लिम समाजात प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल असलेल्या अपार श्रद्धेपोटी अनेक कुटुंबे आपल्या मुलांचे नाव ‘मोहम्मद’ ठेवतात, या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचा अनादर ट्रम्प यांनी केल्याचा आरोप आता होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील तणाव आणि इराणच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. इराणवर टीका करताना ते म्हणाले की, इराण हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे कोणालाही अध्यक्ष पदावर बसण्याची इच्छा उरलेली नाही. यानंतर त्यांनी स्टेजवरून ‘मोहम्मद’ नावाच्या काही काल्पनिक व्यक्तींना इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्याचा अभिनय करून उपस्थितांमध्ये हशा पिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांच्या या उपरोधिक अभिनयाला रॅलीत उपस्थित असलेल्या गर्दीकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तेथे शांतता पाहायला मिळाली.
More incoherent bigoted rambling from Trump: “I’m the president. I can call you whatever the hell I want Muhammad. His name is actually Abdullahalalalala baa ba ba Muhammad El-Sayed. He’s a jihadist” https://t.co/8UxonIlBhP — HOT SPOT (@HotSpotHotSpot) October 16, 2026
credit – social media and Twitter
इराणचे सध्याचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे देशाचे नेतृत्व करत असून, ट्रम्प यांची ही वक्तव्ये अशा वेळी समोर आली आहेत जेव्हा अमेरिकेत राजकीय वातावरण अत्यंत तापलेले आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत ट्रम्प यांनी इराणच्या अणुकारक्रमावरही कठोर भूमिका स्पष्ट केली. इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, असा पुनरुच्चार त्यांनी आपल्या भाषणात केला. याआधीही अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांना आटोक्यात आणण्यासाठी विविध लष्करी व धोरणात्मक पावले उचलली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील नागरी हक्क आणि मुस्लिम संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘कॉन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स’ (CAIR) या अमेरिकेतील सर्वात मोठ्या मुस्लिम मानवाधिकार संघटनेने ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. राजकीय फायद्यासाठी आणि मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते, ट्रम्प आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान सोमाली-अमेरिकन आणि सर्वसामान्य मुस्लिम समुदायाविरोधात वारंवार नकारात्मक रूढीवादी कल्पना (Stereotypes) पसरवत आहेत. CAIR च्या वार्षिक अहवालाचा संदर्भ देत तज्ज्ञांनी सांगितले की, अमेरिकेत अलीकडच्या काळात इस्लामद्वेषाच्या (Islamophobia) घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याला अशा प्रकारची वादग्रस्त भाषणे, स्थलांतरितांवरील कारवाया आणि राजकीय वक्तृत्व जबाबदार ठरत आहे. ट्रम्प यांच्या या नव्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील स्थलांतरित आणि मुस्लिम समाजात अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.






