अमेरिकाच जिंकेल! २१ तासांची चर्चा फिस्कटली; ट्रम्प यांनी अणुबॉम्बवरून इराणला दिला अखेरचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump warning to Iran nuclear bomb : जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पाकिस्तानमधील अमेरिका-इराण चर्चा (US-Israel Iran War) अखेर कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे. सलग २१ तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतरही दोन्ही देश एका मतावर येऊ शकले नाहीत. या अपयशानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्याने संपूर्ण जगात युद्धाची भीती पुन्हा एकदा दाट झाली आहे. फ्लोरिडाहून परतल्यानंतर जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत होता.
इस्लामाबादमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि इराणचे प्रतिनिधी यांच्यात तब्बल २१ तास चर्चा झाली. या चर्चेचा मुख्य उद्देश हा इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणे आणि मध्य-पूर्वेतील तणाव कमी करणे हा होता. मात्र, इराणने अण्वस्त्रे मिळवण्याचे संकेत दिल्याने ही चर्चा फिसकटली. जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, “इराण अशा साधनांचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे त्यांना वेगाने अणुबॉम्ब तयार करता येईल. जोपर्यंत ते हे थांबवण्याचे ठोस वचन देत नाहीत, तोपर्यंत अमेरिका मागे हटणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Price Hike: ‘पेट्रोलच्या किमती विसरू नका!’ ट्रम्प यांच्या नाकेबंदीला इराणचे ‘गणितीय’ उत्तर; अमेरिकेला रडवणारं समीकरण VIRAL
डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भाषेत इराणला सुनावले आहे. ते म्हणाले, “इराण सध्या खूप वाईट परिस्थितीत आहे, ते व्यथित आहेत. आम्ही त्यांच्याशी तासनतास बोललो आहोत आणि आम्हाला त्यांची परिस्थिती नीट माहित आहे. पण एक गोष्ट त्यांनी समजून घ्यावी की, इराण कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्र बाळगू शकत नाही. आम्ही तसे कधीही होऊ देणार नाही.” ट्रम्प यांनी इराणच्या वाटाघाटीच्या टेबलावर परतण्याबाबत विचारले असता सांगितले की, “ते परत येतात की नाही याची मला आता पर्वा नाही. आम्ही आमची बाजू स्पष्ट केली आहे.”
Trump reveals ‘desperate’ Iran wants nuclear weapon after failed peace talks and claims he ‘doesn’t care’ whether Tehran comes back to negotiating table https://t.co/if6ll81tt1 — Daily Mail US (@Daily_MailUS) April 13, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांनी केवळ इराणलाच नव्हे, तर जगालाही संदेश दिला आहे की अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे. व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, “काहीही झाले तरी विजय आपलाच (अमेरिकेचाच) होईल. करार होतो की नाही, याने आमच्या विजयावर फरक पडत नाही.” ट्रम्प यांच्या या विधानामुळे आता राजनैतिक मार्गाऐवजी लष्करी कारवाईचे संकेत तर मिळत नाहीत ना? अशी चर्चा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
इराण सध्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या या दुरवस्थेवर बोट ठेवत त्यांना नमवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, इराणने अण्वस्त्र निर्मितीचा हट्ट सोडलेला नाही, हे चर्चेच्या अपयशावरून स्पष्ट झाले आहे. आता जर इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच ठेवला, तर अमेरिका कठोर निर्बंधांसोबतच मोठा लष्करी निर्णय घेऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इस्लामाबादमधील या अयशस्वी चर्चेनंतर आता संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे.
Ans: इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळाल्यामुळे आणि त्याबाबत ठोस आश्वासन देण्यास नकार दिल्यामुळे २१ तासांची चर्चा फिसकटली.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्र बाळगू शकणार नाही आणि त्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका कठोर पाऊले उचलेल.
Ans: व्हान्स यांनी सांगितले की, जोपर्यंत इराण अण्वस्त्रे न बनवण्याबाबत ठोस वचनबद्धता दाखवत नाही, तोपर्यंत कोणताही करार केला जाणार नाही.






