पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेने होर्मुझवर नाकेबंदी जाहीर केली; इराणने दिली 'गणितीय' धमकी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Mohammad Bagher Ghalibaf math formula X post : जागतिक राजकारणातील तणावाने आता टोक गाठले आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणमधील हाय-व्होल्टेज वाटाघाटी कोणत्याही निर्णयाविना संपल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे प्रभावशाली नेते मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्यातील चर्चेत एकमत न झाल्याने अमेरिकेने आता सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) पूर्णपणे लष्करी नाकेबंदी जाहीर केली आहे. मात्र, इराणने याला घाबरण्याऐवजी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर घाला घालणारा ‘गणितीय इशारा’ देऊन सर्वांना चकित केले आहे.
इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी व्हाईट हाऊसजवळील पेट्रोल पंपावरील सध्याच्या किमतींचा फोटो शेअर करत अमेरिकन जनतेला सुनावले, “सध्याच्या पेट्रोलच्या किमतींचा आनंद घ्या, कारण लवकरच तुम्हाला ४-५ डॉलरचे पेट्रोल स्वप्न वाटू लागेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
त्यांनी पोस्टमध्ये एक गणितीय समीकरण मांडले आहे:
या सूत्राचा अर्थ तज्ञांनी असा लावला आहे की, जर होर्मुझ नाकेबंदीची तीव्रता वाढली ($\Delta O_{BSOH}>0$), तर तेलाच्या किमतीत होणारी वाढ ही साधी नसेल. ती एक ‘चक्रवाढ’ किंवा ‘अरेखीय’ (Non-linear) वाढ असेल. म्हणजेच, पुरवठा थोडा जरी विस्कळीत झाला तरी किमतीत दुपटीने किंवा तिपटीने वाढ होऊन अमेरिकन जनतेचे कंबरडे मोडेल.
Enjoy the current pump figures. With the so-called ‘blockade’, Soon you’ll be nostalgic for $4–$5 gas. ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O) pic.twitter.com/rVxlC6vFWG — محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 12, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) स्पष्ट केले आहे की, सोमवार संध्याकाळपासून (इराणच्या वेळेनुसार ५:३०) इराणच्या सर्व बंदरांवर नाकेबंदी लागू होईल. अरबी आखात आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांना रोखले जाईल. अमेरिकेने म्हटले आहे की, ही नाकेबंदी ‘निःपक्षपाती’ असेल, मात्र ज्या जहाजांना इराणच्या बंदरांशी देणेघेणे नाही आणि ती केवळ होर्मुझमधून प्रवास करत आहेत, त्यांना जाण्याची परवानगी असेल. असे असले तरी, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमा आणि मालवाहतुकीचे दर वाढल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
तज्ञांच्या मते, इराणचा हा इशारा केवळ पोकळ धमकी नाही. “पुरवठा मर्यादित झाला की किमती वाढतात आणि त्या वाढलेल्या किमतींमुळे बाजारात जो दबाव निर्माण होतो, तो पुन्हा किमतींना वर खेचतो,” हे चक्र गालिबाफ यांनी आपल्या सूत्रातून स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्याचे थेट पडसाद अमेरिकेतील गॅस स्टेशन्सवर उमटणार आहेत. ट्रम्प प्रशासनासाठी ही एक मोठी राजकीय जोखीम ठरू शकते, कारण वाढत्या इंधन दरांचा फटका सामान्य अमेरिकन मतदाराला बसणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Blockade: ‘US Centcom’ मैदानात! आज संध्याकाळी 7:30 पासून होर्मुझमध्ये टाळेबंदी; इराणी अहंकाराला अमेरीकन नौदलच देणार उत्तर
इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे भारताचे टेन्शन सर्वाधिक वाढले आहे. भारताची मोठी तेल आयात याच सागरी मार्गावरून होते. जरी इराणने भारतासारख्या मित्र देशांना सूट देण्याचे संकेत दिले असले, तरी अमेरिकेच्या लष्करी नाकेबंदीमुळे कोणत्याही देशाचे जहाज या भागात सुरक्षित उरलेले नाही. यामुळे आगामी काळात भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: जेडी व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी गालिबाफ यांच्यात प्रादेशिक सुरक्षा आणि अटींवर एकमत न झाल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली.
Ans: या सूत्राचा अर्थ असा आहे की, होर्मुझची नाकेबंदी केल्यास तेलाच्या किमतीत साधी वाढ न होता ती चक्रवाढ पद्धतीने (Non-linear) प्रचंड वाढेल.
Ans: अमेरिकन सेंट्रल कमांडच्या (CENTCOM) मते, ही नाकेबंदी सोमवार संध्याकाळपासून (इराणच्या वेळेनुसार ५:३० वाजता) सुरू होणार आहे.






