
Greece Earthquake: ग्रीसच्या सेंटोरिनी बेटावर गेल्या आठवड्यापासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. बुधवारी रात्री 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. त्यामुळे सरकारने बेटावर आणीबाणी जाहीर केली आहे. नागरिक सुरक्षा मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे प्रशासनाला त्वरित आवश्यक उपाययोजना करता येणार आहेत.
३१ जानेवारीपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते, मात्र बुधवारी झालेला भूकंप सर्वात तीव्र होता. सरकारी प्रवक्ते पावलोस मारिनाकिस यांनी सांगितले की, “अग्निशमन दल, पोलिस, तटरक्षक, सशस्त्र सेना आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा सेंटोरिनी आणि आसपासच्या बेटांवर तैनात केल्या आहेत. परिस्थितीवर निरंतर देखरेख ठेवली जात आहे आणि संभाव्य धोका ओळखून योग्य ती तयारी केली जात आहे. अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती नाही, पण सततच्या भूकंपांमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत आणि अनेक लोक बेट सोडून मुख्य भूमीकडे स्थलांतर करत आहेत