इंग्लंड : प्रिन्स चार्ल्स (prince charles) यांना राजेपद मिळाल्यानंतर त्यांची पत्नी कॅमिला यांना राणीचा दर्जा मिळेल, (Camilla Will Get The Status Of Queen Consort) अशी घोषणा ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी शनिवारी केली. विशेष म्हणजे या राज्यारोहण समारंभात, कैमिला अनमोल कोहिनूर हिऱ्याने (kohinoor diamond) जडलेला मुकुट घालणार आहेत. हा कोहिनूर जडलेला मुकुट सध्या क्वीन एलिझाबेथ घालतात. प्लॅटिनम आणि कोहिनूर हिऱ्याने घडवलेला हा मुकुट १९३७ साली, किंग जॉर्जच्या राज्याभिषेकासाठी तयार करण्यात आला होता.
कैमिला डचेस ऑफ कॉर्नवाल आहेत आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांनी कैमिला यांच्याशी विवाह केला होता. प्रिन्स चार्ल्स यांना राजेपद मिळाल्यानंतर, आधीच्या योजनेनुसार कैमिला यांचा दर्जा हा प्रिन्सेसचाच राहणार होता. मात्र या राज्याभिषेक सोहळ्यात, मैमिला यांना महाराणीचा दर्जा मिळावा, अशी मागणी ५ वर्षांपुर्वी प्रिन्स चार्ल्स यांनी केली होती. ती मागणी महाराणी एलिझाबेथ यांनी मान्य केली आहे.
अनुमानावर आणि गृहितकांवर कोहिनूर हिऱ्याचा इतिहास सांगण्यात येतो. सिख राजा रणजीत सिंह यांनी हा हिरा ब्रिटिशांना भेट दिल्याचे एका तर्कात सांगण्यात येते. मात्र इतिहासकार सांगतात की, हा हिरा ब्रिटिशांपर्यंत पोहचण्याच्या आधीच रणजीत सिंह यांचे निधन झाले होते. त्यांनी हा हिरा ब्रिटिशांना दिलेला नाही, असा दुसरा तर्क आहे. हा हिरा अफगाणिस्थानच्या आमीर शुजा दुर्रानीने रणजितसिंह यांना भेट दिला होता असाही दावा सांगण्यात येतो. रणजीतसिंहांकून हा हिरा जबरसदस्तीने इंग्रजांनी घेतला अशीही एक वदंता आहे. ब्रिटीश मात्र हा हिरा भेट मिळाला असल्याचे सांगतात.
[read_also content=”https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/will-give-follow-up-for-purandar-international-airport-says-vijay-shivtare-nrka-233961.html पुरंदर विमानतळासाठी प्रयत्न करणार; विजय शिवतारे यांची ग्वाहीगॅस गिझरमधून वायू गळती झाल्याने बाथरुममध्ये गुदमरुन वैमानिक महिलेचा मृत्यू – सर्वत्र व्यक्त होतेय हळहळ”]
शाह शुजा यांच्या आत्मचरित्रात, रणजीत सिंह शुजाच्या मुलाला त्रास देत असल्याने हा हिरा रणजीतसिंह यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी कोहिनूर अफगाणी हल्लेखोर अहमद शाह अब्दाली याने फारसचा राजा नादिर शाह याच्याकडून जबरदस्तीने घेतल्याचेही सांगण्यात येते. तर मुगल राजा मुहम्मद शाह रंगिला याच्याकडून नादिर शाहाने कोहिनूर घेतल्याचेही सांगण्यात येते. थोडक्यात या कोहिनूरचा इतिहास हा भारत, पाकिस्तान, अफगाणिस्थान, इराणपर्यंत आपल्याला नेतो. गेल्या अनेक वर्षांपासून कोहिनूरवरुन वाद आहे. भारतासह पाकिस्ताननेही कोहिनूरवर आपला हक्क यापूर्वी सांगितला होता.
कोहिनूर बाबत अनेक अफवा आणि अंधश्रद्धाही पसरलेल्या आहेत. हा हिरा त्याच्यासोबत वाईट नशीब घेऊन येतो असेही सांगण्यात येते. रणजीत सिंह यांनी हा हिरा परिधान केला, तर त्यांचे साम्राज्य नष्ट झाले असे मानण्यात येते. तर ज्या ब्रिटिश राजवटीवरचा सूर्य कधीही ढळत नसे, असा उल्लेख होईल, ती राजवटही या हिऱ्यामुळे संपुष्टात आल्याचेही सांगण्यात येते.
[read_also content=”https://www.navarashtra.com/nashik/khandesh/nashik/air-india-pilot-died-due-to-suffocation-caused-by-gas-leak-from-geyser-nrsr-233973.html गॅस गिझरमधून वायू गळती झाल्याने बाथरुममध्ये गुदमरुन वैमानिक महिलेचा मृत्यू – सर्वत्र व्यक्त होतेय हळहळ”]