(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शुक्रवारी (१७ एप्रिल) अमेरिकेच्या तेहरानमध्ये Devoted Daughters of Iran या बॅनरखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली इमाम हुसेन स्क्वेअरपासून ते वालियार इंटरसेक्शन पर्यंत काढण्याकी आले. यावेळी इराणी महिलांनी अमेरिका-इस्रायलच्या धोरणांचा प्रखरपणे विरोध केला. इराणी महिलांच्या मते, शांतता चर्चेच्या नावाखाली इराणच्या सार्वभौमत्त्वाशी तडजोड केली जात आहे. त्यांनी संपूर्ण जगासमोर अमेरिका-इराण (Iran)चर्चेबाबत संशय व्यक्त केला आहे. भूतकाळातील कटू अनुभवांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेऊ शकत नाही असे महिलांनी म्हटले आहे.
दरम्यान याच गदारोळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज इराणसोबत पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. युद्ध कायमचे संपवण्यासठी दोन्ही देशांत कराराची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु इराणच्या जनतेच्या अविश्वासामुळे आणि अमेरिकेसोबतच्या जुन्या इतिहासामुळे चर्चेवर गाढ संशय व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावरुन माहिती देत होर्मुझ खुला केल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या १० दिवसांच्या युद्धविरामांतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यावसायिकांसाठी खुली करण्यात येत आहे. तसेच इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धही तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
इराणच्या या घोषणेमुळे सध्या जागतिक तेल आणि उर्जा पुरवठ्याला दिलासा मिळाला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता कमी होईल. इंधनाचे दर पुन्हा स्थिर होण्यास मदत होईल. पण याच वेळी इस्लाबादमध्ये दुसऱ्यांदा होणाऱ्या शांतता कराराकडेही जगाचे लक्ष लागले आहे. या चर्चेवर जगाचे पुढील भवितव्य टिकून आहे. यामुळे कायमस्वरुपी युद्धविराम होणार की युद्ध पुन्हा भडकणार असा प्रश्न लोकांना पडला आहे.
Ans: तेहरानमध्ये इराणी महिलांनी Devoted Daughters of Iran अंतर्गत अमेरिकेसोबत सुरु असलेल्या शांतता चर्चेचा निषेध नोंदवला आहे. अमेरिकेवर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही असे या महिलांचे म्हणणे आहेय शांतता कराराच्या नावाखाली इराणच्या सार्वभौमत्त्व आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड होऊ नये असे या महिलांनी म्हटले आहे.
Ans: इराणने अमेरिकेसोबच्या १० दिवसांच्या युद्धविराम करारांतर्गत होर्मुझचा मार्ग जगभरातील व्यावसायिकांसाठी खुला केला आहे.






