नवी दिल्ली: सध्या जगामध्ये इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जोरदार युद्ध सुरू आहे. दरम्यान इस्त्रायलने हमासचा पूर्ण नाश केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्रायलने हमासवर अत्यंत जोरदार आणि घातक असे हल्ले केले आहेत. यामध्ये हमासच्या सर्वोच्च कमांडरचा खातमा झाला आहे. त्यामुळे या लढाईला आता मोठे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.
हमासचे नेते याह्या सिनवार यांची हत्या हा गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे आणि ‘हमाससाठी शेवटच्या दिवसाची सुरुवात’ असे वर्णन केले. पण आमचे युद्ध अजून संपलेले नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नेतन्याहू म्हणाले की, होलोकॉस्टनंतर आमच्या लोकांच्या इतिहासातील सर्वात वाईट हत्याकांड करणाऱ्या व्यक्तीसोबत इस्रायलने आपले स्कोअर सेट केले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच हमासने इस्त्रायलवर सर्वात आधी दहशतवादी हल्ला केला होता. ज्यामध्ये सध्या १,२०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले होते. तर शेकडो लोकांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीमध्ये हमासच्या विरोधात युद्धाला सुरुवात केली होती. इस्त्रायलच्या हल्ल्यात ४२ हजारांपेक्षा जास्त नागरिक ठार झाले होते. इस्त्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
इस्रालयने हिजबुल्लाहविरोधात आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. मागच्या चार दिवसांमध्ये इस्रालयने लेबनॉनमध्ये हल्ल्यांचा मारा वाढवला आहे. लेबनॉनमध्ये करणाऱ्या हिजबुल्लाहला या हल्ल्यांची अजितबत अपेक्षा नव्हती. मात्र आता इस्रायलने थेट मुळावरच घाव घालण्यास सुरूवात केली आहे. पेजर ब्लास्ट, वॉकी-टॉकी ब्लास्ट, पुन्हा एअर स्ट्राईक करत हिजबुल्लाचे कंबरडेच मोडले आहे. त्यानंतर इस्त्रायलने हिजबुल्लाहवर आणि लेबनॉनची राजधानी बेरूतवर एअर स्ट्राईक केला आहे.
हेही वाचा: Israel–Hamas War: इस्त्रायलची भेदक कारवाई; ‘एअर स्ट्राईक’ करत केला हिजबुल्लाच्या टॉप कमांडरचा खात्मा
इस्त्रायलने राजधानी बेरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मारला गेला आहे. तर या हल्ल्यात एकूण ७ जण ठार झाले. ६० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून इस्त्रायल हमास यांच्यात युद्धाला सुरूवात झाली आहे. इस्त्रायल सातत्याने हिजबुल्लाहवर रॉकेट हल्ले करत आहे. लेबनॉनमधील पेजर आणि रेडिओ हल्ल्यानंतर हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिजबुल्लाह प्रमुख म्हणाले, इस्त्रायलने लेबनॉनमध्ये ज्या प्रकारे नरसंहार केला आहे. हे तर एक प्रकारे युद्धाचे आवाहन दिल्यासारखे आहे. नागरिकांना लक्ष्य करून इस्त्रायलने मर्यादा ओलांडली आहे. लेबनॉनमधून ४ हजारांपेक्षा जास्त पेजर्स वापरले जात असल्याचे इस्त्रायलला माहिती होते. याचा फायदा उचलत इस्त्रायलने एकाच वेळेस ४ हजार लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फटका हजारो नागरिकांना देखील बसला आहे.