Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुले जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात आहे स्पेशल बजेट; तरीही वाढत नाहीये लोकसंख्या

पूर्व आशियातील जपान हा देश त्याच्या तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. मात्र आता या देशापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जपानची लोकसंख्या यासाठी मोठी समस्या बनत आहे. जपानची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे जन्मदर कमी होत असताना दुसरीकडे मृत्यूदरही वाढत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 26, 2024 | 10:00 AM
जपान सध्या त्यांच्या लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणाच्या बाबीवर चिंतेत आहे.

जपान सध्या त्यांच्या लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणाच्या बाबीवर चिंतेत आहे.

Follow Us
Close
Follow Us:

टोकियो : सुमारे 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत हा देश आहे. संपूर्ण जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. भारत सरकार आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असताना, ज्या देशाची लोकसंख्या कमी होत आहे त्या देशासाठी लोकसंख्या वाढवणे अवघड होत आहे. तंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेला हा देश जपान आहे. जपान सध्या त्यांच्या लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणाच्या बाबीवर चिंतेत आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करणारा आणि अमेरिकेलाही मागे टाकणारा जपान हा देश सध्या लोकसंख्येच्या समस्येला तोंड देत आहे.

जपानच्या लोकसंख्यावाढीची समस्या

सध्या प्रत्येक देश विकास आणि वाढीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे जपानचे लोक कुटुंब न बनावता नोकरीवर लक्ष केंद्रित करत आहेत. परंतु यामुळे भविष्यात जपानच्या विकासाचा वेग मंदावू शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी जपान सरकारने जोडप्यांना मूल होण्यासाठी खास बजेटही सुरू केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

परदेशी नागरिकांच्या लोकसंख्येमध्ये वाढ

पूर्व आशियातील जपान हा देश त्याच्या तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो. मात्र आता या देशापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जपानची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे जन्मदर कमी होत असताना दुसरीकडे मृत्यूदरही वाढत आहे. 2023 मध्ये जपानमध्ये सुमारे 7 लाख मुलांचा जन्म झाला. तर देशात 1.58 दशलक्ष मृत्यूही नोंदवले गेले. 1 जानेवारी रोजी जपानची लोकसंख्या 124.9 दशलक्ष होती. अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की देशातील परदेशी रहिवाशांची लोकसंख्या 11% वाढली आहे. ज्यामुळे देशाची लोकसंख्या प्रथमच 3 दशलक्षांपेक्षा जास्त वाढली आहे. जपानमधील परदेशी नागरिक आता एकूण लोकसंख्येच्या सुमारे 3% आहेत आणि ते बहुतेक 15 ते 64 च्या दरम्यान कार्यरत वयाचे आहेत.

तरुण लग्न, मुले आणि संसार टाळतात

जपानमधील तरुणांना लग्न करायचे नाही आणि लग्न झाले तरी त्यांना मुले होऊ द्यायची नाहीत. असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जपानमध्ये स्त्रिया नोकरी आणि कामाकडे अधिक झुकतात. त्यामुळे मुले ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे दिसते. स्त्रियांचा असा विश्वास आहे की मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना मातांची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांचे लक्ष त्यांच्या कामाकडे कमी होते. तसेच कॉर्पोरेट संस्कृतीत नोकरी करणा-या मातांना अनेकदा नोकरी मिळणे कठीण होते. ज्यामुळे महिला मुले न करण्याचा निर्णय घेतात.

सरकारने विशेष अर्थसंकल्प सादर केला

जपानमध्ये कमी होणार जन्मदर आणि वाढता मृत्यूदर यामुळे, येत्या काळात जपानमधील तरुणांची संख्या कमी होणार आहे. ही अडचण ओळखून जपान सरकारने एक योजना तयार केली. सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात बालकांच्या जन्मासाठी एक योजना मांडली. तरुण जोडप्यांना अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक विशेष बजेट सुरू केले आहे. ज्याची किंमत $34 अब्ज ठेवण्यात आली आहे. या अर्थसंकल्पांतर्गत बाल संगोपन आणि शिक्षणासाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

2070 मध्ये लोकसंख्येची स्थिती काय असेल?

या विशेष बजेटचा उद्देश विवाहित जोडप्यांना मुले होण्यासाठी आकर्षित करणे हा आहे. तसेच तरुणांना लग्नासाठी प्रवृत्त करणे, जेणेकरून देशाची लोकसंख्या वाढेल. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकताच जपानच्या लोकसंख्येचा एक अंदाजही समोर आला आहे ज्यामध्ये 2070 मध्ये जपानची लोकसंख्या किती असेल हे सांगितले आहे. या अंदाजामुळे जपानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सन 2070 पर्यंत जपानची लोकसंख्या अंदाजे 30% ते 87 दशलक्ष पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. लोकसंख्या घटण्याबरोबरच, घटणारी तरुण लोकसंख्या देखील जपानसाठी समस्या बनणार आहे. 2070 मध्ये देशातील प्रत्येक 10 लोकांपैकी चार लोक 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असतील.

Web Title: Japans population has declined for the 15th consecutive year nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • Japan Population Crisis

संबंधित बातम्या

Japan News : जपानमध्ये हरवले 18,000 लोक; डिमेंशिया संकटावर मात करण्यासाठी रोबोट ‘AIREC’ उतरला मैदानात
1

Japan News : जपानमध्ये हरवले 18,000 लोक; डिमेंशिया संकटावर मात करण्यासाठी रोबोट ‘AIREC’ उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.