Mars rock to be auctioned for ₹34 crore scientists upset
Mars rock auction ₹34 crore : अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात मोलाची भर घालणारा एक दुर्मिळ क्षण समोर आला आहे. मंगळ ग्रहाचा एक मोठा तुकडा पृथ्वीवर आढळला असून, तो आता लिलावासाठी सज्ज झाला आहे. या लिलावामुळे शास्त्रज्ञांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे, कारण असा दुर्मिळ तुकडा वैज्ञानिक संशोधनासाठी वापरण्यात यावा, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, हा तुकडा आता खासगी संग्राहकाच्या घरी जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
ही घटना २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात नायजर देशातील अगाडेझ प्रदेशात घडली. एका स्थानिक शास्त्रज्ञाला तेथे २४ किलो वजनाचा एक अनोखा दगड सापडला. तपासणीनंतर समोर आले की हा दगड सामान्य नसून, तो थेट मंगळ ग्रहावरून पृथ्वीवर पडलेला उल्कापिंड आहे. या तुकड्याला NWA 16788 असे नाव देण्यात आले असून, तो आतापर्यंत मंगळावरून पृथ्वीवर पडलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडांपैकी एक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
या तुकड्याचा लिलाव १६ जुलै २०२५ रोजी न्यूयॉर्कमधील ‘सोथेबीज’ (Sotheby’s) या जगप्रसिद्ध लिलाव संस्थेद्वारे केला जाणार आहे. या उल्कापिंडाची संभाव्य किंमत १७ कोटी ते ३४ कोटी रुपयांच्या दरम्यान (सुमारे £५०,००० – £७०,०००) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उल्कापिंड पृथ्वीवर पडणे ही दुर्मिळ घटना असली, तरी आतापर्यंत सुमारे ७७ हजार उल्कापिंड नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये केवळ ४०० उल्कापिंड मंगळ ग्रहावरून आलेले आहेत. म्हणूनच, NWA 16788 हा तुकडा वैज्ञानिक दृष्टीने फारच मौल्यवान मानला जात आहे. त्याचा अभ्यास केल्यास मंगळ ग्रहाची अंतर्गत रचना, खनिजे, आणि प्राचीन इतिहास यासंबंधी अनेक नवे खुलासे होऊ शकतात.
या दुर्मिळ उल्कापिंडाच्या लिलावाने वैज्ञानिक समुदायामध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांच्यामते, अशा ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मौल्यवान असलेल्या वस्तूंचा लिलाव करण्याऐवजी वैज्ञानिक संस्थांकडे वर्ग केला जावा, जेणेकरून त्याचा अभ्यास करून मानवी ज्ञानसंपदेचा विस्तार होऊ शकेल. काही शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वसाहतीच्या दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे, आणि अशा उल्कापिंडांचा वापर संशोधनासाठी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-इराण संघर्षानंतर सर्वोच्च नेते खामेनेई यांची पहिलीच सार्वजनिक प्रतिक्रिया; बंकरमधून बाहेर येऊन दिला राष्ट्रवादी संकेत
वैज्ञानिक तुकड्यांचा अशा प्रकारे खुल्या बाजारात लिलाव होणे ही नैतिकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चिंतेची बाब मानली जात आहे. अशा लिलावामुळे विज्ञानासाठी आवश्यक असलेल्या वस्तू फक्त श्रीमंत संग्राहकांच्या मालकीत जातात आणि त्यामुळे समाजासाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही.
मंगळ ग्रहाचा हा तुकडा केवळ एक खडक नसून, तो आपल्या सौरमालेच्या आणि मंगळ ग्रहाच्या इतिहासाचे दार उघडू शकतो. अशा वेळी, वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंचा लिलाव हा संशोधन आणि मानवजातीच्या प्रगतीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे आता जगभरातील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ याच तुकड्याच्या वाचवण्यासाठी आवाज उठवत आहेत.