Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोवर आजार पुन्हा काढतोय डोके वर- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

संयुक्त राष्ट्र : गेल्या दोन दशकातील माहितीच्या आधारावर जगात पुन्हा एकदा गोवर(measles) हा आजार डोके वर काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)(WHO) गंभीर इशाराही दिला आहे. 

  • By साधना
Updated On: Nov 16, 2020 | 06:08 PM
measles

measles

Follow Us
Close
Follow Us:

संयुक्त राष्ट्र : गेल्या दोन दशकातील माहितीच्या आधारावर जगात पुन्हा एकदा गोवर(measles) हा आजार डोके वर काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)(WHO) गंभीर इशाराही दिला आहे.  डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०१९ मध्ये गोवरमुळे २ लाख नागरिक मृत्यूच्या दाढेत गेले आहेत.  एवढेच नव्हे तर गेल्या दोन दशकात या आजाराच्या सर्वाधिक रुग्णांची नोंदही झाली आहे.  हा आजार नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांवर करण्यात आलेल्या उपाययोजनांवर आता वाढत्या रुग्णसंख्येमुळे पाणी फेरले असल्याचेही दिसून येत आहे.  डब्ल्यूएचओ आणि सीडीसीच्या अहवालानुसार गेल्या दहा वर्षात लसीकरण ठप्प झाले असल्यानेच या आजारात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

२०१९ मध्ये आजारामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत घट नोंदविण्यात आली होती. २०१९ च्या आकडेवारीनुसार ५० टक्के रुग्णसंख्या वाढलेली दिसून येते. अहवालातील माहितीनुसार, वाढती प्रकरणे एक विशिष्ट देश वा विशिष्ट भागात नोंदविण्यात आले नसून जवळपास प्रत्येक देशात प्रकरणे वाढली आहेत.  जगभरात गोवर आजाराचे साडेआठ रुग्ण आहेत.  जागतिक महामारी कोविड-१९ मुळे जगातील विविध आजार रोखण्यासाठी जे लसीकरण केले जाते त्याचा वेग मंदावला असल्यामुळेच जुने आजार पुन्हा डोके वर काढत असल्याचे म्हटले आहे.

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविड-१९ मुळे लसीकरणाचा वेग मंदावला असून २६ देशातील जवळपास ९ कोटींपेक्षा अधिक लोकांना या आजाराने विळखा घातला आहे. काही देशांमध्ये गोवरने पुनश्च डोके वर काढल्याचे दिसत आहे.  सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, जॉर्जिया, समोआ, युक्रेन, कांगो, मैदागास्कर, उत्तर मॅसेडोनियासह अन्य मोठ्या देशांमध्येही या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीएटा फोर यांनी गोवर आणि कोविड-१९ चा धोका अद्यापही टळलेला नाही याकडे लक्ष वेधले. जागतिक महामारीमुळे अन्य आजारांविरोधात लढा देण्यात अडचणी उद्भवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गोवर आजारावर उपचार आहे परंतु जोपर्यंत ९५ टक्के मुलांचे लसीकरण केले जात नाही तपोर्यंत त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य आहे असेही हेनरीएटा म्हणाल्या.

सन २००० पासून आजवर गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे अडीच कोटी लोकांना वाचविण्यात यश आले आहे.  तथापि मर्यादित प्रमाणात वॅक्सीन असल्यामुळे दरवर्षी हजारो मुले या आजाराला बळी पडत आहेत.  त्यामुळेच आजार पसरण्यास सुरुवात होते. २०१९मध्ये अशी प्रकरणे समोर येताच पूर्वी मिळविलेले यशही झाकोळले गेले आहे. बहुतांश देशातील आरोग्य यंत्रणा ढेपाळल्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळेही गोवर लसीकरण ठप्प झाले आहे. यासोबतच काही देश वॅक्सीनचा शोध घेण्याबाबत माघारही घेत असल्याबाबत अहवालात नमूद करण्यात आले आहे.

[read_also content=”कमला हॅरिस यांच्या पतीने नोकरी सोडण्याचा घेतला निर्णय, पत्नीला करणार मदत https://www.navarashtra.com/latest-news/kamala-harris-husband-took-decision-to-leave-job-for-his-wife-52754.html”]

Web Title: Measles disease increase worls wide world health organizations intimation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2020 | 06:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.