७ लाख स्पीड, ९८० डीग्री तापमान; आज सूर्याच्या इतक्या जवळ असणार NASA चं हे यान
विश्वाची निर्मिती कशी झाली यावर संशोधकांकडून दीर्घ काळापासून संशोधन सुरू आहे. त्याआधी आपल्या सूर्यमालेतील केंद्रबिंदू असलेल्या सूर्याच्या निर्मितींंमागचं रहस्य उलगडनं महत्त्वाचं आहे. त्यासाठीचं नासाने अंतराळात यान पाठवलं आहे. आता नासाच्या इतिहासातील सर्वात वेगवान अंतराळयान पार्कर सोलर प्रोब या रहस्यमय ताऱ्याच्या जवळ जाण्यासाठी सज्ज झाले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था NASA चे अंतराळयान पार्कर सोलर प्रोब (PSP) आज (24 डिसेंबर 2024) सायंकाळी तळपत्या सूर्याच्या अगदी जवळून जाणार आहे.
PM Awas Yojana : महाराष्ट्राला २० लाख घरं मिळणार; पंतप्रधान आवास योजनेतील या जाचक अटीही हटवल्या
पार्कर सोलर प्रोब आतापर्यंतचं सर्वात वेगवान यान असून 692000 किमी प्रति तास या आश्चर्यकारक वेगाने पुढे जात आहे, ज्याला पृथ्वीवरून चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी एका तासापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. PSP यान 2018 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलं होतं आणि आता सूर्याच्या अगदी जवळून जाणार आहे.
On Dec. 24, our Parker Solar Probe will make history with a record-breaking closest approach to the Sun ☀️
Follow along in real time with this interactive visualization, brought to you by @NASA_eyes and @NASASun: https://t.co/DXeKvMdJsl pic.twitter.com/zQUdlozvqt
— NASA (@NASA) December 23, 2024
अंतराळ यानाची रचना अशीच अशी करण्यात आली आहे की 1,600 ते 1,700 अंश फॅरेनहाइट (870 ते 980 अंश सेल्सिअस) तापमानातही सुस्थितीत राहिलं. यानात बसवण्यात आलेली थर्मल शील्ड आणि आधुनिक उपकरणे उष्णतेपासून सुरक्षित राहतील. या यानाने आतापर्यंत सूर्याभोवती अनेक प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते सूर्याच्या पृष्ठभागापासून केवळ 4.5 दशलक्ष मैलांवर पोहोचेल, जे अंतराळाच्या दृष्टीने खूप जवळ आहे.
जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी (JHUAPL) येथे या यानाची रचना करण्यात आली होती. हे अंतराळ यान 12 ऑगस्ट 2018 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील केप कॅनवेरल एअर फोर्स स्टेशनवरून सूर्याच्या बाह्य कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले. थेट सूर्याच्या वातावरणात जाणारे हे पहिले अंतराळयान आहे. ते सूर्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 4 दशलक्ष मैलांच्या अंतरावर असेल. हे अंतराळयान मानवाने बनवलेले आतापर्यंतचे सर्वात वेगवान यान आहे.
पृथ्वीवरून समजणे अशक्य असलेल्या सूर्याची रहस्यं जाणून घेणं वैज्ञानिकांचे उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, सूर्याच्या कोरोनाचे तापमान (बाह्य थर) त्याच्या पृष्ठभागापेक्षा लाखो पटीने अधिक उष्ण का आहे? सूर्याच्या क्रियाकलपांचा आपल्या पृथ्वीवर मोठा प्रभाव पडतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे यान सूर्याच्या बाहेरील थरातून निर्माण होणाऱ्या सौर वादळांची माहिती देणार आहे. कारण या सौरवादळांचा उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर परिणाम होतो.
या ऐतिहासिक मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना सूर्यावरील घडामोडींची माहिती समजण्यास मदत होणार आहे. त्याचा डेटा वापरून जीपीएस आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानात सुधारणा करता येऊ शकते. पृथ्वीवर येणारी सौरवादळे रोखण्यासाठी उपाययोजना करता येतील का? याचा विचार आता हे यान 22 मार्च 2025 आणि 19 जून 2025 रोजी सूर्याच्या अगदी जवळून जाणार आहे.