Pakistan News : ट्रम्प यांची चमचागिरी फळली! पाकिस्तानला IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran War: ‘1 तासात 7 दावे आणि सातही खोटे…’, Donald Trump वर भडकले इराण; Hormuz बाबत मोठा दावा
सध्या पाकिस्तानला IMF ने कर्ज मंजूर केले असून स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने कर्जासाठी ठेवलेल्या बहुतांश अटी पूर्ण केल्या आहेत. विशेष करुन उर्जा क्षेत्रात आणि कर प्रणालीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी इंधन आणि उर्जा दरवाढ झाली होती. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर याचा फटका बसत होता.
गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि IMF मध्ये स्टाफ लेव्हल एग्रीमेंट करण्यात आले होते. २८ मार्च २०२६ रोजी IMF ने जाहीर केले होते की, पाकिस्तानने एक्सटेंडेड फंड फॅसिलीटी अंतर्गत सर्व निकष पूर्ण केले आहेत. यामुळे १.२ अब्ज डॉलरचा ब्लॅकआउट निधी मंजूर केला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला मिळालेल्या या आर्थिक मदतीमागे अमेरिकेचा हात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकतेमुळे IMF कडून कर्ज मंजूर झाले आहे. कारण अलीकडच्या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी वारंवार ट्रम्प यांना भेट दिली होती. त्यांना बलूचिस्तानमधील रेअर मिनिरल्स गिफ्ट म्हणून देऊ केले होते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला ही खुशामत फळली आहे.
शिवाय पाकिस्तान सध्या अमेरिका इराण वादातही मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. यामध्ये इराण आणि अमेरिका दोन्ही देशांकडून पाकिस्तानचे कौतुक करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानला धोरणात्मक भागीदार म्हणून संबोधले आहे, तर दुसरकीडे इराणने देखील बंधु देश म्हणून उल्लेख केला आहे.
पाकिस्तानला IMF कडून नाही तर सौदी अरेबियाकडूनही २ अब्ज डॉलरची मदत मिळाले आहे. परंतु सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. शेती, आयटी, आणि विक्री क्षेत्राला कराराच्या कक्षेत आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या परदेशी मदतीचा फायदा पाकिस्तानने करतो का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BREAKING: Pakistan set to receive $1.2 billion more in bailout funds from the International Monetary Fund pic.twitter.com/BWRh5R1xje — Shashank Mattoo (@MattooShashank) April 18, 2026






