Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL

Panama Earthquake : पनामामध्ये ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे धक्के राजधानीपर्यंत जाणवले. भूकंपानंतर अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.
Panama 7.6 magnitude earthquake Tsunami warning Panama Colombia Ecuador
Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • पनामात ७.६ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप

  • अनेक देशांमध्ये त्सुनामीचा धोका

  • वित्तीय आणि इमारतींचे नुकसान

मध्य अमेरिकेतील पनामा (Panama Earthquake) देशामध्ये शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ एक शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७६ इतकी मोजली गेली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या महाभूकंपाचा केंद्रबिंदू पनामाच्या दक्षिण टोकाजवळ, पिटालोसा अरिबाच्या नैऋत्येला अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आणि जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची खोली कमी असल्यामुळे त्याचे धक्के अत्यंत तीव्र स्वरूपात जाणवले आणि संपूर्ण पनामा सिटी हादरून निघाली.

पनामा भूकंपाची पार्श्वभूमी आणि भूकंपाचा केंद्रबिंदू

राजधानी पनामा सिटीमध्ये इमारती मोठ्या प्रमाणात डोलू लागल्यामुळे नागरिक अत्यंत घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी तातडीने रस्त्यावर व मोकळ्या जागेवर धावून आले. सोशल मीडियावर या भूकंपाचे अनेक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये जमीन हादरत असल्याचे आणि जुन्या इमारतींचे भाग सुट्टे होऊन खाली पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पनामाच्या पानोनोम या मध्यवर्ती शहरात एका ऐतिहासिक इमारतीचा टॉवर आणि काही निवासी इमारतींच्या बाल्कनी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

credit - social media and Twitter

त्सुनामीचा हाय अलर्ट आणि शेजारील देशांवर सावधगिरीचा इशारा

या अत्यंत शक्तिशाली भूकंपाची तीव्रता पाहता, अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांनी गंभीर पावले उचलली आहेत. पनामाच्या किनारपट्टीसह दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील अनेक देशांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कोलंबिया, इक्वेडोर, निकाराग्वा आणि ग्वाटेमाला या देशांचा समावेश असून, किनारी भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

credit - social media and Twitter

भूकंपानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पनामाचे राष्ट्राध्यक्ष होजे राऊल मुलिनो यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट संदेश दिला की, "या दुर्दैवी घटनेचा वापर समाजात अफवा किंवा अनावश्यक घबराट पसरवण्यासाठी करू नये." शिक्षण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि शैक्षणिक संस्था तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन पथके आणि सिनाप्रोकची टीम तातडीने मदतकार्यात जुंपली असून, बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

credit - social media and Twitter

आंतरराष्ट्रीय मदत आणि मानवी एकजूट

या भीषण नैसर्गिक संकटाच्या काळात लॅटिन अमेरिकेतील मित्र राष्ट्रांनी पनामाच्या मदतीसाठी तातडीने हात पुढे केला आहे. कोलंबिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, इक्वेडोर, चिली, डॉमिनिकन रिपब्लिक, पेरू, एल साल्वाडोर आणि होंडुरास यांसारख्या देशांनी पनामा सरकारशी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शवली आहे. राष्ट्राध्यक्ष होजे राऊल मुलिनो यांनी या कठीण प्रसंगी मिळालेल्या जागतिक पाठिंब्याबद्दल आणि एकजुटीच्या संदेशाबद्दल सर्व मित्र राष्ट्रांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

credit - social media and Twitter

सरकारकडून बाधित नागरिकांना तात्पुरते आश्रयस्थान, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पनामा प्रशासन कोणत्याही मोठ्या जीवितहानी टळल्याबद्दल सुटकेचा श्वास घेत असले, तरी त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे किनारपट्टीवर अजूनही सतर्कतेचा पाहरा दिला जात आहे.

credit - social media and Twitter