US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या 'तेल' कराराची घोषणा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या राजकीय आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US-Russia Oil Deal) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर एका मोठ्या इंधन कराराची अधिकृत घोषणा केली आहे. या करारानुसार, रशिया अमेरिका आणि जागतिक बाजारपेठांमधील इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी तातडीने लाखो टन डिझेलचा पुरवठा करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर वाढणाऱ्या महागाईशी लढणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना या ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली आहे. या चर्चेचा मुख्य निष्कर्ष म्हणजे रशिया अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी तात्काळ ३,००,००० टनांपेक्षा जास्त डिझेल इंधनाची खेप रवाना करेल. इतकेच नव्हे तर येत्या काही महिन्यांत रशियन रिफायनरीजच्या क्षमतेनुसार हा पुरवठा उत्तरोत्तर वाढवण्यात येणार आहे.
ट्रम्प यांनी या कराराची रूपरेषा मांडताना सांगितले की, ३ लाख टनांच्या पहिल्या तातडीच्या खेपेनंतर रशिया नोव्हेंबर महिन्यात अतिरिक्त ५,००,००० टन डिझेलचा पुरवठा करेल. त्यानंतर लवकरच आणखी १० लाख टन डिझेल बाजारात आणले जाईल. भविष्यात रशियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांच्या (Oil Refineries) क्षमतेचा आढावा घेऊन हा पुरवठा तब्बल ३० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महाकाय पुरवठ्यामुळे जागतिक बाजारातील इंधनाची चणचण पूर्णपणे संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती आणि रशियातील तेल शुद्धीकरणाच्या समस्यांमुळे गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डिझेल, गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी तंचाई निर्माण झाली होती. आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात आखाती देश आणि रशियाकडून होणारी निव्वळ इंधन निर्यात दररोज १.६ दशलक्ष बॅरलने घटली होती. तसेच युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक तेलसाठा ५०७ दशलक्ष बॅरलने कमी झाला होता. अशा बिकट परिस्थितीत अमेरिका आणि रशियामधील हा नवीन करार जागतिक अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारा ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
या कराराची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचा म्हणजेच ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीचा’ (Strait of Hormuz) विशेष उल्लेख केला. ट्रम्प यांच्या मते, या मोक्याच्या सागरी मार्गावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. रशियाकडून होणारा डिझेलचा अजस्त्र पुरवठा आणि सागरी व्यापारी मार्गावरील सुरक्षेमुळे बाजारात इंधनाचे दर वेगाने खाली येतील. विशेषतः अमेरिकेतील शेतकरी, पशुपालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि ट्रक चालकांसाठी इंधनाचे दर कमी करणे हे आपल्या प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
I have just concluded a highly successful discussion with President Vladimir Putin, of Russia, wherein it was agreed that Russia will immediately supply over 300,000 Tons of Diesel Fuel to the American and Global Marketplace, another 500,000 Tons during the month of November, and 1,000,000 Tons immediately thereafter. Additionally, based on the condition of their Diesel Refineries, Russia will then deliver, within a short period of time, 3,000,000 Tons of Diesel Fuel. Between our TOTAL CONTROL of the Strait of Hormuz, and this great announcement on Russian Energy, Diesel Prices for Americans and, indeed, the World, will be COMING DOWN, IN RECORD NUMBERS, AND FAST! Lower prices for Americans, especially our Great Farmers, Ranchers, and Truckers, is my Greatest Priority. This is a very big and important announcement. Additionally, it must be understood, that Iran will not have a Nuclear Weapon! Thank you for your attention to this matter. President DONALD J. TRUMP ( TS: Oct 9 2026, 2:46 PM ET ) — Commentary Donald J. Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) October 9, 2026
credit – social media and Twitter
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढून संपूर्ण जगात महागाईचा भडका उडाला होता. मात्र, डिझेलचे दर कमी झाल्यास मालवाहतूक स्वस्त होईल, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना मिळेल. ट्रम्प यांनी या कराराला जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘गेम चेंजर’ असे संबोधले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MEA India H1BVisa : जे. डी. व्हान्स यांच्या ‘गुलाम’ वक्तव्यावर भारताचा पलटवार; परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन जारी
ऊर्जा करारासोबतच ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही आपले मत अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अणुशस्त्रे बाळगण्याची परवानगी दिली जाणार नाही, हे संपूर्ण जगाने समजून घेणे गरजेचे आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे.
दुसऱ्या बाजूला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील गुरुवारी एक महत्त्वाचे विधान केले होते. मॉस्को येथे बोलताना पुतिन यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेला प्रादेशिक संघर्ष सोडवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया इराणला शक्य ती सर्व मध्यस्थी व मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे एकीकडे अमेरिका-रशिया ऊर्जा कराराची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मध्यपूर्वेतील युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही महासत्ता पडद्यामागून हालचाली करत असल्याचे संकेत मिळत आहेत.






