फोटो सौजन्य AI
तिच्या संशोधनात सर्वेक्षणाच्या पद्धती , प्रश्न आणि डेटा याबाबत पारदर्शकता ठेवण्यावर भर असतो . Pew च्या माहितीनुसार संस्थेच्या संशोधनाला The Pew Charitable Trusts आणि इतर संस्थांकडून निधी मिळतो . मात्र संशोधनाचे विषय आणि निष्कर्ष स्वतंत्रपणे ठरवले जातात ,असे Pew सांगते .
अमेरिकेत ट्रम्प यांचे सरकार सत्तेत आल्यापासून अमेरिकेत इतर देशातून आलेल्या आणि इतर देशातून येऊन अमेरिकेन नागरिक झालेल्या लोकांबद्दल अमेरिकेतील श्वेत हे तिरस्काराची भावना आणि वागणूक देतात , याचे कैक व्हिडीओस सोशल मीडियावर पाहायला मिळाले . ट्रम्प यांनीच अमेरिका फर्स्ट हे वाक्य निवडणुकांमध्ये वापरून अमेरिकेत आता आपण कोणते राजकारण करणार आहोत याचे संकेत दिले . याच पार्श्वभूमीवर हा सर्वे महत्वाचा मानला जातोय .
Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
Pew Research Center ने २०२३ मध्ये ३५७६ अमेरिकन प्रौढांचे सर्वेक्षण केले . त्यात ५१ % अमेरिकनांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले , तर ४४ % लोकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले . म्हणजेच अमेरिकेत भारताची प्रतिमा एकुणात सकारात्मक असली तरी मत जवळपास दोन गटात विभागलेले दिसते .
Pew च्या indian American सर्वेक्षणातून चित्र आणखी सकारात्मक आहे . अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी ७६ % जणांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे . त्यापैकी ५१ % जणांचे मत अनुकूल होते . फक्त ६ % जणांनी भारताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले ,तर १६ % जणांनी तटस्थ मत दिले .याच सर्वेक्षणात ८६ % भारतीय अमेरिकनांनी अमेरिकेबद्दल अनुकूल मत व्यक्त केले . त्यामुळे भारतीय अमेरिकन समुदायामध्ये अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांविषयी मोठ्या प्रमाणात सकरात्मक भावना असल्याचे दिसते .
Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !
यामध्ये पूर्णपणे अमेरिकन लोक भारताला पसंद करत नसले तरी ते पूर्णपणे भारताला नापसंद करत आहेत असा निष्कर्ष यातून निघत नाही . दोन्ही देशांमधील राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध हे खूप महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे . आज पर्यंत भारताने नेहमीच सामंज्यसाची भूमिका घेऊन आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे . असे राजकीय विश्लेषक सांगतात .



