Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Red Sea: लाल समुद्रात तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला; हुथी बंडखोरांनी हल्ला केल्याचा संशय

लाल समुद्रात ग्रीक तेलाच्या टॅंकरवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामुळे टॅंकरला आग लागली मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हल्ल्यामुळे टँकरला आग लागल्यानंतर चालक दलाने ते सोडून दिले. त्यामुळे ते आता नियंत्रणात राहिलेले नाही

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 22, 2024 | 10:49 AM
लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला

लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: बुधवारी लाल समुद्रात ग्रीक तेलाच्या टॅंकरवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामुळे टॅंकरला आग लागली मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हल्ल्यामुळे टँकरला आग लागल्यानंतर चालक दलाने ते सोडून दिले. त्यामुळे ते आता नियंत्रणात राहिलेले नाही आणि ते अनियंत्रितपणे वाहत आहे. ब्रिटिश लष्कराने ही माहिती दिली. यापूर्वी लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी हा हल्ला केल्याचा संशय ब्रिटिश लष्कराने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपासून लाल समुद्रात सतत हल्ले होत होते. विशेषत: व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात होते. आत्तापर्यंत झालेल्या हल्ल्यातील हा क्षेपणास्त्र हल्ला सर्वात गंभीर होता. गाझा पट्टीत इस्रायल-हमास युद्धादरम्यान हुथी बंडखोर जहाजांना लक्ष्य करत असताना हे घडले आहे. या मार्गावरून दरवर्षी 1000 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मालाची वाहतूक केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार येमेनच्या बंदर झहर होडेदापासून 140 किलोमीटर अंतरावर समुद्रात हा हल्ला झाला. लहान बोटीतील हल्लेखोरांनी लहान शस्त्रांनी जहाजाला लक्ष्य केले. ग्रीसच्या शिपिंग मंत्रालयाने या टँकरचे नाव सौनियन असे ठेवले आहे. जहाजावर चार रॉकेट सोडण्यात आले. हे क्षेपणास्त्र हल्ले होते की ड्रोनमधून रॉकेट केले गेले हे स्पष्ट झाले नाही. “जहाजाचे नियंत्रण सुटले आहे,” UKMTO ने सांगितले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर यूकेएमटीओने जहाजाला आग लागल्याचा इशारा दिला.

जहाज सायप्रसला जात होते

ग्रीक शिपिंग मंत्रालयाने नंतर हल्ला केलेल्या जहाजाची ओळख टँकर स्युनियन म्हणून केली. हल्ल्याच्या वेळी 25 क्रू मेंबर्स होते आणि ते इराकहून सायप्रसला जात होते. यूकेएमटीओने दिलेल्या माहितीनुसार एडनच्या आखातातही दुसऱ्या जहाजालाही लक्ष्य करण्यात आले. जहाजाच्या जवळ असलेल्या पाण्यात तीन स्फोट झाले, तरीही यात कोणतेही नुकसान झाले नाही. हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये गाझा पट्टीमध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून, हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोनसह सुमारे 80 जहाजांवर हल्ले केले आहे. त्यांनी एक जहाज ताब्यात घेतले, दोन बुडाले आहे. तसेच हुथी बंडखोरांनी चार खलाशांना ठार केल्याचीही माहिती आहे. बंडखोरांचा दावा आहे की, गाझामधील हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध संपवण्यासाठी इस्रायल, अमेरिका किंवा ब्रिटनच्या जहाजांना लक्ष्य केले जात आहे. तथापि, इराणला जाणाऱ्या काही जहाजांसह, हल्ला झालेल्या अनेक जहाजांचा संघर्षाशी कोणताही संबंध नाही.

Web Title: Red sea missile attack on oil tanker in red sea suspected of attack by houthi rebels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 10:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.