Riyadh Airport: कुणी विश्रांती घेत होते तर कुणी वाट पाहत होते, क्षणात बदलले चित्र; रियाध विमानतळावरील हल्ल्याचा VIDEO VIRAL ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
सौदी अरेबियाची राजधानी रियाध (Riyadh Airport) येथील अत्यंत महत्त्वाच्या अशा किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पुन्हा एकदा तीव्र क्षेपणास्त्र हल्ला झाला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण विमानतळ परिसर हादरून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण हल्ल्यात एक पाकिस्तानी नागरिक जागीच ठार झाला असून, अन्य ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (CA) दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना तातडीने नजीकच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे विमानतळावरील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून, त्याचे मूल्यांकन करण्याचे काम सध्या सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून या प्रदेशात सुरू असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सुरक्षा आणि हवाई वाहतूक धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच शनिवारीही अशाच प्रकारच्या एका हल्ल्याची बातमी समोर आली होती. त्या घटनेत किमान १२ जण प्राणास मुकल्याचे वृत्त होते. परिस्थितीची तीव्रता पाहता प्रशासनाला विमानतळावरील सर्व नियमित कामकाज तात्काळ थांबवावे लागले होते. या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण गल्फ प्रदेशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Al Arabiya shows footage of the moment yesterday’s Houthi attack struck King Khalid International Airport in Riyadh, including Umrah pilgrims preparing to board their flights before the strike. https://t.co/Gp2xPdmkuK — Al Arabiya English (@AlArabiya_Eng) October 11, 2026
credit – social media and Twitter
रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर, शनिवारच्या घटनेचे एक धक्कादायक व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही यात्रेकरू उमराहसाठी विमानात चढण्याची अंतिम तयारी करत होते, तर काही प्रवासी आपल्या पाळीची वाट पाहत आराम करत होते. अचानक झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर विमानतळावर एकच घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावरा पळू लागले.
🔴 Exclusive footage obtained by Al Arabiya English shows Umrah pilgrims preparing to board their flights as the Houthi attack struck Riyadh’s King Khalid International Airport. https://t.co/Ws92NujHKd — Al Arabiya English (@AlArabiya_Eng) October 11, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Riyadh Airport Attack : रियाध विमानतळावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, 12 ठार व 300 जखमी; भारताकडून तीव्र निषेध
येमेनच्या इराण-समर्थित हौथी (Houthi) बंडखोरांनी गेल्या २४ तासांत घडवून आणलेल्या या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या आर्थिक आणि वाहतूक केंद्रांना अशाच प्रकारे लक्ष्य करत राहण्याची उघड धमकी दिली आहे, ज्यामुळे सौदी प्रशासनापुढील आव्हाने अधिक वाढली आहेत.
हौथी बंडखोरांच्या सततच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे रियाध विमानतळाची बंदी आणखी २४ तासांसाठी वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘फ्लाइटराडार२४’ (Flightradar24) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर माहिती दिली आहे की, विमानतळ सोमवार रात्री २१०० जीएमटी (GMT) पर्यंत पूर्णपणे बंद राहील. विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद असल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत असून, अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रशासनाने प्रवाशांना संबंधित एअरलाईन्सशी संपर्क साधूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Several videos are circulating appearing to show damage inside the King Khalid International Airport in Riyadh Saudi Arabia today reportedly from a missile strike. Some of the videos show injured or dead people inside the airport but Saudi official accounts/media haven’t said anything. As a reminder – in Saudi Arabia, and many other countries in the region, sharing videos like this is a criminal offense so information doesn’t flow like it does in many western countries. Avoid war in the Middle East accordingly… #war #saudiarabia #iran #yemen #israel #riyadh #airport #GCC #houthis #shia #sunni — Mrgunsngear (@Mrgunsngear) October 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय! बुढी गंडकी नदीच्या प्रवाहात घरे अन् पूल वाहून गेले; नागरिकांना हायअलर्ट, VIDEO VIRAL
फक्त रियाधच नव्हे, तर पूर्व सौदी अरेबियातील महत्त्वाचे दम्माम विमानतळ (Dammam Airport) देखील या हल्ल्यांच्या रडारवर आले आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने यापूर्वीच दम्माम विमानतळावरही संकट ओढवल्याची पुष्टी केली होती. सौदीच्या नेतृत्वाखालील सुरक्षा आघाडीने पूर्व भागात एक धोकादायक ड्रोन हवेतच नष्ट केल्याचे जाहीर केले आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाच्या हवाई सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर कडक भूमिकेची मागणी होत आहे.






