Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
आर्थिक जगतातील सर्वात मानाचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार 2026 (Nobel Prize) जाहीर झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे छोटे-मोठे आर्थिक निर्णय आणि विचार संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा खोलवर परिणाम करतात, हे आपल्या संशोधनातून सिद्ध करणारे दिग्गज अर्थतज्ज्ञ रॉबर्ट ई. हॉल (Robert E. Hall) आणि मायकेल वुडफोर्ड (Michael Woodford) यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दोघांच्या संशोधनाने आधुनिक मॅक्रोइकोनॉमिक्स (स्थूल अर्थशास्त्र) कडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकला आहे.
पारंपारिक अर्थशास्त्रामध्ये केवळ मोठ्या कंपन्या, सरकारचे निर्णय आणि जागतिक बाजारपेठेवर जास्त भर दिला जात असे. मात्र, रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांनी हे सिद्ध केले की, जेव्हा एखाدی सामान्य व्यक्ती महागाई वाढेल असा विचार करून खरेदी कमी करते किंवा भविष्यातील नोकरीच्या अनिश्चिततेमुळे पैसे वाचवायला लागते, तेव्हा त्याचा थेट आणि मोठा परिणाम संपूर्ण देशाच्या जीडीपी (GDP), रोजगार निर्मिती आणि मंदीवर होत असतो.
रबर्ट ई. हॉल यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हे दाखवून दिले की, जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी येते, तेव्हा ती अचानक येत नाही. मंदी येण्यामागे लोकांचा खर्च करण्याचा कल आणि कंपन्यांचे गुंतवणूक धोरण यांच्यातील परस्परसंबंध कारणीभूत असतात. लोक जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खर्च कमी करतात, तेव्हा उत्पादनांची मागणी घटते आणि पर्यायाने कंपन्यांना उत्पादन आटोते घ्यावे लागते, ज्यामुळे बेरोजगारी वाढते. हॉल यांच्या या सिद्धांतामुळे सरकार आणि धोरणकर्त्यांना मंदीच्या काळात योग्य पावले उचलण्यास मोठी मदत झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणीनंतर गव्हर्नर हाऊस पेटवले; पोलिसांचा थेट गोळीबार, स्थिती हाताबाहेर
त्यांनी मजुरीचे दर, कामगारांची उत्पादकता आणि कामगार बाजारातील चढ-उतार यांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण केले. सामान्य माणूस महागाईच्या काळात कसा ताळमेळ साधतो आणि त्याचे हे वर्तन देशाच्या अर्थकारणावर कसा प्रभाव टाकते, हे समजून घेण्यासाठी हॉल यांचे संशोधन मार्गदर्शक ठरले आहे.
दुसरीकडे, कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक मायकेल वुडफोर्ड यांनी ‘मॉनेटरी पॉलिसी’ (मौद्रिक धोरण) आणि लोकांच्या अपेक्षा (Expectations) यांच्यातील संबंधांवर अभूतपूर्व प्रकाश टाकला. वुडफोर्ड यांनी दाखवून दिले की, रिझर्व्ह बँक किंवा फेडरल रिझर्व्हसारख्या मध्यवर्ती बँका जेव्हा व्याजदर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा केवळ प्रत्यक्षात घडणारी कृती महत्त्वाची नसते, तर सर्वसामान्य लोकांचा त्या निर्णयावर आणि भविष्यातील महागाईवर काय विश्वास आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2026 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Robert E. Hall and Michael Woodford “for microeconomic foundations of macroeconomic stabilisation.” #NobelPrize https://t.co/2i7ktB1Q2b — The Nobel Prize (@NobelPrize) October 12, 2026
credit – social media and Twitter
जर लोकांना वाटले की भविष्यात महागाई वाढणार आहे, तर ते आजच जास्त खर्च करू लागतात, ज्यामुळे खरोखरच महागाई वाढते. याला ‘अपेक्षित महागाई’ (Inflation Expectations) म्हटले जाते. वुडफोर्ड यांनी हे सिद्ध केले की, मध्यवर्ती बँकांनी केवळ आकडेवारी सुधारण्यापेक्षा जनतेसोबत योग्य संवाद साधून भविष्याबद्दलचा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांच्या या सिद्धांतामुळे आज जगातील बहुतेक सर्व प्रमुख बँका आपले व्याजदर धोरण आखताना लोकांच्या मानसिकतेचा आणि अपेक्षांचा प्रामुख्याने विचार करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?
आजच्या वेगवान डिजिटल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी, महागाई, युद्धे आणि पुरवठा साखळीतील बिघाड यामुळे सर्वसामान्य नागरिक सतत चिंतेत असतात. अशा वेळी एक साधा नागरिक जेव्हा पेट्रोलचे वाढते दर पाहून किंवा बँकेचे कर्जाचे हप्ते वाढल्यामुळे आपल्या घरातील मासिक बजेट बदलतो, तेव्हा तो एक प्रकारे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या रचनेला आकार देत असतो.
रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांनी हेच वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले की, अर्थशास्त्र हे केवळ कागदावरच्या मोठ्या आकडेमोडींचे नाही, तर ते कोट्यवधी सामान्य माणसांच्या दैनंदिन निर्णयांचे फलित आहे. या दोन्ही अर्थतज्ज्ञांच्या कामामुळे आज जागतिक स्तरावर मंदीचा सामना करणे, योग्य व्याजदर ठरवणे आणि आर्थिक स्थैर्य टिकवणे सोपे झाले आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक सामान्य माणसाच्या विचारांचा गौरव आहे, जो आपल्या लहान-मोठ्या आर्थिक निर्णयांनी संपूर्ण जगाचे अर्थकारण चालवतो.






