IAF Chief Operation Sindoor: भारतीय वायु दलाने भारत पाक सीमेवर मोठी कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. वायुदलाने सीमालगत भागात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची तळं आणि पाकीस्तानी लढाऊ विमानं बेचिराख केल्याची माहिती वायुदलाचे अधिकारी एपी सिंह यांनी दिली आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर भारतीय हवाईदलाने केलेल्या कारवाईबाबत सविस्तर सांगितलं आहे.
S-400मिसाईल सिस्टीमने पाकिस्तानी विमाने धुळीला मिळवली, ज्यामध्ये AEW&C/ELINT विमानांना 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले होते.ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबत अमरप्रीत सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाचे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल सिस्टिमने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली आणि एक AWACS विमान पाडले. अमरप्रीत सिंह पुढे असंही म्हणाले की, S-400 या मिसाईल सिस्टीमने ही पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यामध्ये AEW&C/ELINT विमानांना 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले.
पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या चौक्यांवर केलेल्या कारवाईचे पुरावेही एअर चीफ मार्शल सिंग यांनी सादर केले. वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,कारवाईबाबतच्या सगळ्या गोष्टी आधीच निश्चित करण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांचे तळ ओळखून अचूकपणे लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यापूर्वी आणि नंतर सॅटेलाईटच्या मदतीने उधवस्त झालेल्या ठिकाणांचं मूल्यांकन करण्यात आले. या मोहिमेतील अत्याधुनिक शस्त्र प्रणालींमुळे ही कारवाई यशस्वी झाली आणि शत्रूचे मोठे नुकसान झाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल भारतीय हवाई दलाने अधिकृतपणे निवेदन देण्याची ही पहिलीच वेळ आहे.. एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले की,S-400 प्रणाली अलीकडेच हवाई दलात समाविष्ट करण्यात आली आहे आणि ती संपूर्ण ऑपरेशनमध्ये गेम-चेंजर ठरली. त्याच्या रेंजमुळे पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेजवळ येण्यापासून आणि त्यांच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बचा वापर करण्यापासून रोखले गेले.