Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ देशात तंत्र-मंत्र आणि भविष्य सांगणाऱ्या लोकांवर कारवाई; 1500 हून अधिक लोकांना अटक

अलीकडच्या काळात जादू-टोणा, तंत्र-मंत्र करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून असे लोक लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना फसवतात. मध्य आशियातील ताजिकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2025 | 04:50 PM
Tajikistan took action against 'witchcraft' and fortune-telling people

Tajikistan took action against 'witchcraft' and fortune-telling people

Follow Us
Close
Follow Us:

दुशानबे: अलीकडच्या काळात जादू-टोणा, तंत्र-मंत्र करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असून असे लोक लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना फसवतात. मध्य आशियातील ताजिकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या जादूटोणा, भविष्यवाणी आणि पारंपरिक तंत्र-मंत्र करुन उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रथांना बेकायदेशीर ठरवून सरकारने याला देशाच्या परंपरा आणि इस्लामिक मूल्यांच्या विरोधात म्हटले आहे.

इतक्या लोकांवर कारवाई

ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रखमोन यांनी स्पष्टपणे जाहीर केले की अशा प्रथांमुळे फसवणूक, अयोग्य धार्मिक शिक्षण, आणि अंधश्रद्धांना चालना मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानच्या सरकराने आत्तापर्यंत 1500 हून अधिक जादूटोणा करणाऱ्या लोकांना अटक केली आहे. याशिवाय,5000 पेक्षा अधिक प्रार्थना आणि मंत्राच्या आधारे उपचार करण्याचा दावा करणारे मुल्ला किंवा मौलवी देखील कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत-बांगलादेश सीमेवर 1.4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; BSFच्या कारवाईत तस्करी उघड

शिक्षेची तरतूद

या प्रकरणांत दोषी आढळलेल्या व्यक्तींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 13,300 डॉलर दंड आकारण्यात येऊ शकतो असे सरकारने म्हटले आहे. हा दंड एका सामान्य ताजिक नागरिकाच्या सहा वर्षांच्या पगाराएवढा आहे.

भितीने लपून कार्य सुरु 

सरकारी कारवाईनंतर तंत्र-मंत्र, जादूटोणा लोक करणारे आता गुप्तपणे आपले काम करत असल्याची माहिती ताजिकिस्तानच्या सरकरला मिळाली असून त्यांचा शोध सुरु आहे. ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रखमोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी घरात ग्राहकांना बोलावणे थांबवले असून, काही जण स्वतः ग्राहकांच्या घरी जात आहेत. अध्यक्षांनी सांगितले की, एका ज्योतिषी महिलेने मान्य केले असून, ती आता लोकांनी घरी बोलावत नाही. त्याऐवजी त्यांच्याकडे जाते असे म्हटले आहे. हे सरकारच्या दबावामुळे लोकांनी आपली कार्यपद्धती बदलली आहे, पण ही प्रथ पूर्णतः संपुष्टात आलेली नाही.

सामाजिक असमानता आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव

ताजिकिस्तानातील तंत्र-मंत्र आकर्षण अंधश्रद्धेपुरते मर्यादित नाही. हे आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी जोडलेले आहे. पारंपरिक वैद्यकीय उपचार महाग असल्यामुळे गरीब लोक स्वस्त उपायांसाठी ज्योतिषांकडे वळतात. एका महिला नागरिकेने म्हटले की, “पारंपरिक वैद्यकीय उपचार खूप महाग आहेत, त्यामुळे जादूटोणाचे उपायच स्वस्त वाटतात.” समाजशास्त्रज्ञ मेहरिगुल अबलेझोवा यांच्यानुसार, सामाजिक असमानता आणि उत्तम आरोग्य सेवांच्या अभावामुळे लोक अशा प्रथांकडे वळत आहेत.

विशेषज्ञांचे म्हणण्यानुसार, फक्त दडपशाही करुन या प्रथा संपुष्टात येणार नाहीत. देशातील सर्व नागरिकांनी समान आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. यामुळे ते अशा वैकल्पिक मार्गांचा आधार घेणार नाहीत. यामुळे अशा प्रथा संपवायच्या असतील तर सरकारने लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत ‘या’ ठिकाणी लपला आहे; असा झाला उलगडा या रहस्याचा

Web Title: Tajikistan took action against witchcraft and fortune telling people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 04:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.