Mulla Hassan Akhund will lead the Taliban government
काबूल : अफगाणिस्थानात (Afghanisthan) सत्तेत असलेल्या तालिबानकडून(Taliban) दररोज नवनवी फर्मान काढण्यात येतात. आता काढण्यात आलेल्या नव्या फर्मानात (New Controversial Rule By Taliban), सरकारी कर्मचाऱ्यांना दाढी ठेवणे (Beard To Government Employees), हे सक्तीचे करण्यात आले आहे. जर सरकारी नोकरी करायची असेल तर यापुढे दाढी राखणे हे बंधनकारक असणार आहे. सोमवारी दाढी नसलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यापासून रोखण्यात आले, तसेच त्यांचे ड्रेस कोडही तपासण्यात आले. अफगाणिस्थानच्या धार्मिक मंत्रालयाने सराकरी कार्यालयात येण्याचा पेहरावही निश्चित केला आहे. दाढी काढू नये आणि स्थानिक पोशाखाप्रमाणे लांब कुर्ता, पायजामा घालण्याची सक्ती आता कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे.
[read_also content=”‘कच्चा बादाम’नंतर आता सोशल मीडियावर ‘काला अंगूर’ ची जादू, व्हिडिओ एकदा बघाच https://www.navarashtra.com/viral/kala-angoor-sellers-video-viral-on-social-media-nrsr-261262.html”]
तर दुसऱ्या एका फर्मानात, विमान कंपन्यांना महिलांच्या प्रवासाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. महिलेसोबत कुणी पुरुष नातेवाईक नसेल तर त्या महिलेला विमानात प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याआधीच्या एका आदेशात अम्युझमेंट पार्कमध्ये पुरुष आणि महिलांना एकत्र प्रवेश नाकारण्यात आला आहे. महिलांनी एकट्याने प्रवास करु नये आणि शाळेत जाऊ नये, असे फर्मान काढणाऱ्या तालिबान राजवटीबाबत संताप व्यक्त होत आहे.