थ्रेडसचे जगभरातून एका वर्षात 175 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते झाले आहेत
सततच्या दैंनंदिनीला कंटाळून विरंगुळा म्हणून सर्वचजण सोशल मीडियाचा वापर करत असतात. सोशल मीडिया हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे बनले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वचजण सोशल मीडिया ॲप्सचा वापर करत असतात. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे ॲप्सतर लहान मुले देखील वापरतात. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गने सर्व सोशल मीडिया ॲप्सचा ताबा घेतला आहे. आणि नुकतेच मेटा या सोशल मीडिया कंपनीच्या थ्रेडस ॲपने नवीन विक्रम केला आहे. थ्रेडसचे जगभरातून एका वर्षात 175 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते झाले आहेत. त्यामुळे CEO मार्क झुकरबर्ग ने आनंद व्यक्त केला आहे.
थ्रेड्स या ॲपने अनोखा विक्रम केला आहे. हे ॲप लॉन्च झाल्यांनतर वर्षभरातच खूप लोकप्रिय झाले आहे. मेटा ने मागील वर्षी 5 जुलै रोजी इंस्टाग्रामवर थ्रेड्सचे हे प्लॅटफॉर्म लाँच केले होते. मार्कने सांगितले की एक वर्ष पूर्ण होण्याआधीच 175 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते थ्रेड्स वापरत आहेत. आणि ही त्यांच्यासाठी मोठी बाब आहे. प्ले स्टोअरवर थ्रेड्स लाँच केल्यानंतर, त्याने थेट मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) सोबत स्पर्धा केली. थ्रेड्ससाठी X वापरकर्त्यांना या ॲपकडे वळवणे हे खूप मोठे आव्हान होते.
थ्रेड्स लाँच केल्याच्या एका आठवड्यात, 100 दशलक्ष वापरकर्त्यांनी ते वापरण्यास सुरुवात केली आणि त्यामागील कारण म्हणजे इंस्टाग्राम वापरकर्ते सहजपणे थ्रेड्स प्रोफाइल सेट करू शकतात. या फीचरमुळे युजर्सना थ्रेड्सवर प्रोफाईल बनवताना कोणतीही अडचण आली नाही. पण काही युजर्सना थ्रेड्स आवडले नाहीत त्यामुळे ते त्यापासून दूर राहिले.
झुकेरबर्ग काय म्हणाले?
थ्रेड्स ॲपला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, झुकरबर्गने पोस्ट केले आणि लिहिले, “किती वर्ष झाले.” यापूर्वी झुकेरबर्गने थ्रेड्सचा MAU आकडा म्हणजेच मंथली ऍक्टिव्ह यूजर्स हे 150 दशलक्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले होते. मासिक सरासरी वापरकर्ता संख्या (MAU) थ्रेडच्या लोकप्रियतेची फक्त एक बाजू दाखवते. जी रोज सक्रिय असलेल्या वापरकर्त्यांची संख्या आणि वापरकर्ते ॲपवर किती वेळ घालवत आहेत यासारख्या मुख्य मेट्रिक्स कॅप्चर करत नाहीत.
मार्केट इंटेलिजन्स फर्म सेन्सर टॉवरच्या मते, थ्रेड्सच्या सेवेमुळे वापरकर्ते त्याकडे जास्त आकर्षित झाले आहेत. परंतु कंपनीला यूजर्स ची एंगेजमेंट वाढवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. सेन्सर टॉवरच्या डेटानुसार, यूजर्सनी थ्रेड्सवर दररोज सुमारे तीन तास आणि सात मिनिटे घालवली आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैच्या आकडेवारीशी तुलना केली तर ते अंदाजे ७९% आणि ६५% कमी आहे.