Hormuz Strait: 'ट्रम्पचे आदेश नाही मानणार' १० हजार सैनिकांच्या डोळ्यांदेखत ५ Blacklisted ships पसार; 'US Navy'ची जगात नाचक्की ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump Hormuz blockade failed 2026 : जागतिक राजकारणात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या विरोधात पुकारलेली नाकेबंदी. पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी इराणची रसद तोडण्यासाठी कडक नाकेबंदी (Blockade) जाहीर केली. मात्र, ताजी उपग्रह चित्रे आणि सागरी ट्रॅकिंग डेटा (Maritime Tracking Data) काही वेगळीच आणि खळबळजनक कथा सांगत आहेत. अमेरिकेने ज्या जहाजांना ‘ब्लॅकलिस्ट’ केले होते, त्यापैकी पाच जहाजांनी अमेरिकन नौदलाच्या नाकाखालून हा मार्ग ओलांडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाने सोमवारपासून होर्मुझमध्ये कोणत्याही जहाजाला प्रवेश न देण्याची शपथ घेतली होती. मात्र, ‘मुरलिखशान’ नावाच्या टँकरने, ज्याचा संबंध रशियन आणि इराणी तेल व्यापाराशी आहे, अत्यंत शिताफीने ही नाकेबंदी तोडली. एवढेच नाही तर चीनशी संबंधित ‘रिच स्टारी’ हे जहाज २,५०,००० बॅरल मिथेनॉल घेऊन कोणत्याही अडथळ्याशिवाय इथून पुढे गेले. अमेरिकेने या जहाजावर आधीच निर्बंध लादले होते, तरीही हे जहाज अमेरिकन युद्धनौकांच्या निगराणीतून कसे सुटले, हा मोठा प्रश्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL
अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) चा दावा आहे की त्यांनी १०,००० पेक्षा जास्त सैनिक, डझनभर युद्धनौका आणि विमाने या मोहिमेवर तैनात केली आहेत. पहिल्या २४ तासांत काही लहान जहाजांना मागे फिरण्यास भाग पाडले गेले, हे खरे असले तरी, मोठ्या माशांनी (मोठ्या टँकर्सनी) मात्र पळवाट शोधलीच. लायबेरियन ध्वज असलेला ‘एल्पिस’ हा टँकर इराणच्या बुशेहर बंदरातून निघाला आणि थेट सामुद्रधुनी पार करून गेला. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BREAKING: Two oil tankers executed 180-degree turns at the Strait of Hormuz within minutes of the US naval blockade taking effect, per MarineTraffic AIS data and CBS News. The Rich Starry, flagged in landlocked Malawi, turned back approximately 20 minutes after the blockade… pic.twitter.com/44VYPZG78k — The Hormuz Letter (@HormuzLetter) April 13, 2026
credit – social media and Twitter
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, रशिया आणि चीन अमेरिकेच्या या नाकेबंदीला जुमानत नाहीत. ‘मुरलिखशान’ आणि ‘रिच स्टारी’ या जहाजांनी ज्या प्रकारे ही मर्यादा ओलांडली, त्यावरून इराणला या दोन महासत्तांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसून येते. इराणच्या इमाम खोमेनी बंदरावर नांगरलेले ‘ख्रिस्तियाना’ नावाचे मालवाहू जहाजही नाकेबंदीनंतर सहजपणे बाहेर पडले. हे केवळ तांत्रिक अपयश नसून, जागतिक राजकारणातील अमेरिकेच्या घसरत्या प्रभावाचे संकेत असल्याची चर्चा आता संरक्षण तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lebanon Crisis: युगांतराची नांदी! इस्रायल-लेबनॉन दशकांनंतर पहिल्यांदाच एका टेबलवर; मार्को रुबियो यांनी चर्चेला म्हटले ऐतिहासिक
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात संवेदनशील व्यापारी मार्ग आहे. जर ही नाकेबंदी अशीच विस्कळीत राहिली, तर जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण होईल. एका बाजूला अमेरिका म्हणतेय की मार्ग बंद आहे आणि दुसऱ्या बाजूला जहाजे जात आहेत, यामुळे जहाज वाहतुकीचा विमा (Insurance) आणि सुरक्षिततेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ट्रम्प आता या अपयशानंतर लष्करी कारवाई अधिक तीव्र करणार की रशिया-चीनच्या दबावासमोर झुकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Ans: अमेरिकन नौदलाची मोठी फळी तैनात असतानाही, रशिया आणि चीनशी संबंधित किमान पाच ब्लॅकलिस्टेड जहाजांनी तांत्रिक पळवाटा शोधून हा मार्ग यशस्वीपणे पार केला.
Ans: 'मुरलिखशान', 'एल्पिस', 'रिच स्टारी' आणि 'ख्रिस्तियाना' यांसारख्या मोठ्या टँकर्सनी आणि मालवाहू जहाजांनी अमेरिकेची नाकेबंदी तोडली.
Ans: सेंटकॉमच्या (CENTCOM) १०,००० सैनिकांच्या तैनातीनंतरही ही जहाजे निसटल्याने अमेरिकेच्या जागतिक लष्करी प्रतिमेला धक्का बसला आहे.






