US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज...; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गालिबफ शनिवारी (११ एप्रिल २०२६) सकाळी इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी विमानातील रिकाम्या सीटवर लहान मुलांचे फोटो, शाळेचे दप्तर आणि शूडज ठेवलेले दिसत आहेत. या दप्तर आणि शूजवर रक्ताचे डाग दिसत आहे. या सीटवर एक फूलही अर्पण करण्यात आले आहे.
हा फोटो २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरापराध मुलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आला आहे. इराणमधील मीनाब शहरात एका शाळेवर हल्ला झाला होता. ज्यामध्ये १६० हून अधिक विद्यार्थींनींचा मृत्यू झाला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये गालिफब या फोटोंकडे पाहत शांतपणे उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी याला माझ्या प्रवासातील सोबती असे भावूक कॅप्शन दिले आहे.
Yes, Trump crushed the 168 families of the Minab school by killing their children. Who is this bloodthirsty vampire in the White House? The flight of Minab-168 landed in Islamabad, Pakistan. Ghalibaf (the head of Iran’s parliament) is arriving for negotiations with his… pic.twitter.com/jeWk7A1FBL — Jonah Cohen (@JonahCohen66018) April 11, 2026
दरम्यान इस्लामाबादला पोहोचल्यावर गालिफब यांनी एक मोठे खळबळजनक विधानव केले आहे. इराण चर्चेत पूर्ण प्रामाणिकपणे सहभागी होईल, परंतु आम्हाला अमेरिकेवर विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी अमेरिकेसोबतच्या जुन्या अनुभवांचा उल्लेख केला. त्यांच्या मतचे इराण सुरुवातीपासूनच चर्चेत सामील झाला होता, परंतु त्यांच्यावर दोन वेळा हल्ले करण्यात आले.
गालिफब यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणच्या अटी मान्य केल्या जात नाही, तोपर्यंत औपचारिक चर्चा सुरु होणार नाही. त्यांच्या मते, जुनी आश्वासने आणि वचनबद्धता पूर्ण करणे ही नव्या शांतता कराराची पहिली पायरी आहे.
इराणच्या शिष्टमंडळात इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचे नेते अली अकबर अहमदियन आणि इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबफ यांचा समावेश आहे. सध्या ही चर्चा जगाच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णयाक मानली जात आहे.






