rishi sunak
लंडन : ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्थात 4 जुलै रोजी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टी आणि विरोधी लेबर पार्टी यांच्यात लढत होत आहे. मात्र, निवडणूकपूर्व सर्वेक्षणात लेबर पार्टी बहुमत मिळवण्याचा दावा करत आहे. त्यातच विद्यमान अध्यक्ष ऋषी सुनक यांच्याविरोधात अनेक नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेतृत्व ऋषी सुनक आणि लेबर पार्टीचे नेतृत्व कीर स्टर्मर करत आहेत. कामगार पक्षाचे नेते कीर स्टर्मर हे माजी मानवाधिकार वकील आणि मुख्य सरकारी वकील आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात लेबर पार्टीने बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. अशा स्थितीत कीर स्टर्मर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच निगेल फरेज हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. फरेज हे युरोपियन संसदेचे माजी खासदार, ब्रिटीश राजकारणातील सर्वात फुटीर नेत्यांमध्ये गणले जातात. 2016 मध्ये बहुसंख्य ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मत देण्यास मदत केल्यामुळे त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘मिस्टर ब्रेक्सिट’ असे नाव मिळवलं होतं. उद्या होणाऱ्या निवडणुकीत ते आठव्यांदा खासदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.