पंजाब : अनेक राज्यांतून सध्या काही जागांचे निकाल हाती येत आहेत. तर पंजाबमध्ये एकून ११७ जागांवर लढत आहे. आपची मात्र पंजाबमध्ये सरशी पाहायला मिळत आहे. आताच हाती आलेल्या आकडेवारीनुसार आपला पंजाबमध्ये १७ जागा दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार आप पंजाबमध्ये मोठा पक्ष ठरत आहे.
त्यामागोमाग काँग्रेसही मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेसला १२ जागा दाखवण्यात येत आहेत. तर देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपला अगदीच कमी जागा मिळताना दिसत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला केवळ २ जागा मिळताना दिसत आहेत.
एक्झीट पोल्समध्ये काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या तीनही राज्यात काँग्रेसची सरकारे स्थापन व्हावीत, यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आणि नेत्यांनी पूर्ण तयारी केली आहे.
गेल्या निवडणुकीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या काँग्रेस पक्षाने, आमदार दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या गळाला लागू नयेत, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्याचे ठरवले हे. यासाठी छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेषश बघेल यांच्याकडे उत्तराखंडची, अजय माकन यांच्याकडे पंजाबची तर कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्याकडे गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.