पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election result 2022) जाहीर होत आहेत. या निवडणुकीत पाच पैकी चार राज्यांत भाजपने (BJP) जवळपास स्पष्ट बहुमत मिळवल्याचं दिसत आहे. तर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेसला न निवडता जनतेनं केजरीवालांंच्या आम आदमी पक्षाला पसंती दिली आहे. या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाच राज्यांच्या निकालावर आता राज्यातील सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायली सुरुवात झाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यातले भाजप (Bjp) नेतेही ये तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, चा नारा देऊ लागले आहेत. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले आहे. महाराष्ट्र अभी बाकी म्हणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है! अशा शब्दात शरद पवारांनी महाराष्ट्र भाजपशी लढायला तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच राजकारणात पक्ष कधी ना कधी हारतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. असेही ते म्हणाले.
[read_also content=”गोरखपूरमधून योगींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या चंद्रशेखर यांना किती मते मिळाली? https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/up-election-result-2022-gorakhpur-urban-yogi-adityanath-vs-chandrashekhar-azad-ravan-seat-result-nrvb-252540.html”]