TVS ज्युपिटर 125 ABS टेस्टिंगदरम्यान दिसली; लवकरच होणार लाँच, किंमत 7,000 रुपयांनी वाढणार?

टीव्हीएस ज्युपिटर 125 ABS स्कूटर लाँचपूर्वी टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. नवीन मॉडेलमध्ये सिंगल चॅनल ABS मिळणार असून इंजिन आणि डिझाइनमध्ये मोठे बदल अपेक्षित नाहीत. सध्याच्या टॉप व्हेरिएंटपेक्षा किंमत 4,000 ते 7,000 रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे.
TVS Jupiter 125 ABS Spotted During Testing
TVS Jupiter 125 ABS Spotted During Testing (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 

  • टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये नवीन सिंगल चॅनल ABS मिळणार आहे.

  • नवीन व्हेरिएंटची किंमत 4,000 ते 7,000 रुपयांनी वाढू शकते.

  • स्कूटरमध्ये 124.8 सीसी इंजिन आणि LCD डिस्प्ले कायम राहण्याची शक्यता आहे.

TVS मोटर कंपनी आपल्या लोकप्रिय ज्युपिटर 125 स्कूटरमध्ये नवीन सेफ्टी फीचर जोडण्याच्या तयारीत आहे. नवीन TVS ज्युपिटर 125 ABS स्कूटर लाँचपूर्वी कोणत्याही कव्हरशिवाय टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. या नवीन मॉडेलमध्ये सिंगल चॅनल ABS मिळणार आहे. सध्या 125 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी अ‍ॅक्सेस ही स्टँडर्ड सिंगल चॅनल ABS असलेली एकमेव स्कूटर आहे. त्यामुळे टीव्हीएसचे नवीन मॉडेल दाखल झाल्यानंतर या सेगमेंटमध्ये आणखी एक सुरक्षित स्कूटरचा ऑप्शन मिळेल.

TVS Jupiter 125 ABS Spotted During Testing
TVS ची '82 Series Collection' सादर! RR 310 ते Ronin 250 चे खास कॉन्सेप्ट मॉडेल्स आले जगासमोर!

डिझाइनमध्ये मोठे बदल नाहीत

समोर आलेल्या फोटोजनुसार, नवीन ज्युपिटर 125 ABS च्या डिझाइनमध्ये किंवा इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल दिसत नाही. स्कूटरची सध्याची बॉडी स्टाइल आणि सायकल पार्ट्स कायम ठेवण्यात आले आहेत. पण नवीन ABS सिस्टिममुळे ब्रेकिंगदरम्यान चाक लॉक होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. विशेषतः ओल्या रस्त्यांवर आणि अचानक ब्रेक लावताना हे फीचर उपयोगी ठरू शकते.

किंमत 4,000 ते 7,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता

सध्या टीव्हीएस ज्युपिटर 125 चार व्हेरिएंटमध्ये विकली जाते. यामध्ये ड्रम अलॉय, डिस्क, DT SXC आणि SmartXonnect यांचा समावेश आहे. टॉप SmartXonnect व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 91,235 रुपये आहे. रिपोर्टनुसार, नवीन ABS व्हेरिएंटची किंमत यापेक्षा 4,000 ते 7,000 रुपयांनी जास्त असू शकते. टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या मॉडेलमध्ये TFT स्क्रीनऐवजी DT SXC व्हेरिएंटमधील LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत 90,550 रुपये आहे.

TVS Jupiter 125 ABS Spotted During Testing
TVS Ntorq150 Spectral Green रंगात लाँच! TFT व्हेरिएंटची किंमत 1.22 लाख रुपये; जाणून घ्या अजून काय आहे खास

इंजिन आणि फीचर्स

टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये 124.8 सीसी सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 6,500 rpm वर 8.45 bhp पॉवर आणि 4,500 rpm वर 11.1 Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटरमध्ये पुढे 220 मिमी डिस्क आणि मागे 130 मिमी ड्रम ब्रेक मिळतात. दोन्ही बाजूंना 12-इंच टायर्स देण्यात आले आहेत. याशिवाय 163 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 765 मिमी सीट हाइट मिळते.

ज्युपिटरच्या विक्रीचा मोठा टप्पा

टीव्हीएस ज्युपिटरने भारतीय मार्केटमध्ये 1 कोटी युनिट्सच्या एकत्रित प्रोडक्शनचा टप्पा गाठला आहे. तामिळनाडूमधील होसूर प्लांटमधून 1 कोटीवी स्कूटर बाहेर पडली. मे 2026 मध्ये कंपनीने DT SXC व्हेरिएंटसाठी आयव्हरी मॅट कॉपर ब्रॉन्झ आणि आयव्हरी एलिट ग्रीन हे नवीन कलरही सादर केले होते. आता ABS व्हेरिएंटमुळे ज्युपिटर 125 च्या कस्टमर्सना आणखी एक सुरक्षित ऑप्शन मिळू शकतो.