TVS 82 Series Racing Heritage Concepts Unveiled (फोटो सौजन्य-AI एआय)
TVS मोटर कंपनीने EICMA 2026 मध्ये आपल्या रेसिंग इतिहासाला अनोख्या पद्धतीने उजाळा दिला आहे. कंपनीने ‘TVS 82 Series Collection’ सादर करत TVS Racing च्या 1982 पासून सुरू झालेल्या प्रवासाचा गौरव केला आहे. या खास कलेक्शनमध्ये TVS RR 310, TVS RTR 310, TVS RTX 300 आणि TVS Ronin 250 अशा 4 मोटरसायकल्सचे वेगवेगळे कॉन्सेप्ट मॉडेल्स दाखवण्यात आले आहेत. ही नवीन प्रोडक्शन मॉडेल्स नसून रेसिंग वारशाला समर्पित खास डिस्प्ले बाइक्स आहेत.
RR 310 आणि RTR 310 चे खास कॉन्सेप्ट
या कलेक्शनमधील RR 310 ही स्पोर्ट्स बाईक आपल्या फुल्ली फेयर्ड डिझाइनमुळे विशेष ठरते. टीव्हीएसच्या रेसिंग स्पर्धांमधील अनुभवाचा प्रभाव या कॉन्सेप्टमध्ये दाखवण्यात आला आहे. ट्रॅकवर मिळालेला एक्सपिरीयंस नेहमीच्या रस्त्यांवर चालवता येणाऱ्या स्पोर्ट्स बाइक्सच्या विकासासाठी कसा उपयोगी ठरतो, हे यातून स्पष्ट होते.
दुसरीकडे, RTR 310 कॉन्सेप्टमध्ये रायडर सेफ्टी आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नोलॉजीवर भर देण्यात आला आहे. यात कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि व्हीली कंट्रोल यांसारख्या फीचर्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हे सर्व सिस्टम 6-अॅक्सिस IMU च्या मदतीने काम करतात. रेसिंगमधील टेक्नोलॉजी सामान्य रायडर्सपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न यातून दिसतो.
RTX 300 आणि Ronin 250 कॉन्सेप्टमध्ये काय खास?
TVS RTX 300 या कॉन्सेप्टमध्ये अॅडव्हेंचर टूरिंगचा अनुभव मांडण्यात आला आहे. ही बाईक ऑफ-रोड ट्रेल्सवर फिरण्यासोबतच सामान्य रस्त्यांवरही वापरता येईल, अशा संकल्पनेवर आधारित आहे. यामुळे TVS चा रेसिंग अनुभव केवळ रेस ट्रॅकपुरता मर्यादित नसल्याचे दिसते.
या कलेक्शनमधील Ronin 250 हे मॉडेलही चर्चेचा विषय ठरले आहे. यात स्क्रॅम्बलर आणि रोडस्टर डिझाइनचा मिलाफ करण्यात आला आहे. क्लासिक लूकसोबत शहरी रस्त्यांवर सहज चालवता येईल, अशी याची कन्सेप्ट आहे. पण Ronin 250 हे नाव पाहून नवीन प्रोडक्शन बाईक लाँच होणार असल्याचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल.
चारही बाइक्स केवळ कॉन्सेप्ट मॉडेल्स
टीव्हीएसने स्पष्ट केले आहे की, या चारही मोटरसायकल्स केवळ वन-ऑफ कॉन्सेप्ट बिल्ड्स आहेत. सध्या त्यांचे प्रोडक्शन किंवा विक्री सुरू करण्याची कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. एकूणच, 1982 मध्ये सुरू झालेल्या TVS Racing च्या प्रवासाला 44 वर्षे पूर्ण होत असताना, EICMA 2026 मधील हे कलेक्शन कंपनीच्या रेसिंग वारशाची आणि इंजिनिअरिंग अनुभवाची आठवण करून देते.
Ans: या कलेक्शनमध्ये TVS RR 310, TVS RTR 310, TVS RTX 300 आणि TVS Ronin 250 या चार मोटरसायकल्सचा समावेश आहे.
Ans: नाही. Ronin 250 हे सध्या केवळ कॉन्सेप्ट मॉडेल आहे. कंपनीने या बाईकच्या प्रोडक्शन किंवा विक्रीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
Ans: टीव्हीएसच्या मोटरस्पोर्ट्स प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये झाली. याच रेसिंग वारशाचा गौरव करण्यासाठी कंपनीने 82 Series Collection सादर केले आहे.






