
5 best electric scooters you can gift your mom this mothers day nrvb
मातृदिन (Mothers Day) हा आईप्रती आपले प्रेम व कौतुक व्यक्त करण्याचा खास क्षण आहे. आईला आनंदित करण्यासाठी अनेक गिफ्ट पर्याय (Gift Options)उपलब्ध असले तरी बाहेर फेरफटका मारायला आवडणाऱ्या किंवा परिवहनासाठी सोईस्कर साधनाची गरज असलेल्या मातांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) सर्वोत्तम गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर्स पर्यावरणास अनकूल, किफायतशीर व ऑपरेट करण्यास सुलभ आहेत, ज्यामुळे त्या सर्व वयोगटातील मातांसाठी योग्य गिफ्ट आहेत. या लेखामध्ये आम्ही यंदा मातृदिनानिमित्त तुमच्या आईला भेट देता येतील अशा सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सबाबत चर्चा करत आहोत.
बाऊंस इन्फिनिटी ई1 मध्ये स्वॅपेबल 2 केडब्ल्यूएच 48 व्होल्ट 39 एएच बॅटरी पॅकसह हब मोटर आहे, जी प्रतितास 65 किमीची अव्वल गती देते. 2.9 बीएचपीचे सर्वोच्च पॉवर आऊटपुट व 83 एनएमचे सर्वोच्च टॉर्क देत ही इलेक्ट्रिक स्कूटर दोन राइड मोड्स देते – इको व स्पोर्ट. आयपी67-प्रमाणित लिथियम-आयन बॅटरी एका चार्जमध्ये 85 किमीची रेंज देण्याची दावा करते, तसेच चार ते पाच तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. किफायतशीर किंमत असलेल्या इन्फिनिटी ई1 मध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, जिओफेन्सिंग, ॲण्टी-थेफ्ट व टो अलर्ट्स आणि पंक्चर झाल्यास स्कूटर पुढे नेण्यासाठी ड्रॅग मोड अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 14 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-14-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
ऑप्टिमा सीएक्समध्ये 550 वॅट बीएलडीसी मोटर आहे, जी 1.2 बीएचपीची सर्वोच्च शक्ती देते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 52.2 व्होल्ट, 30 एएच लिथियम फॉस्फेट बॅटरी आहे, जी 4 ते 5 तासांमध्ये सूपंर्ण चार्ज होते. कंपनीने सिंगल व डबल बॅटरी व्हेरिएण्ट्समध्ये स्कूटर सादर केली आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे 62,190 रूपये व 77,490 रूपये आहे. डबल बॅटरी असलेले व्हेरिएण्ट एका चार्जमध्ये 140 किमीची रेंज देते आणि प्रतितास 45 किमीची अव्वल गती प्राप्त करू शकते.
एकीकृत यूएसबी पोर्ट, एलसीडी स्क्रिन, कीलेस एण्ट्री व ॲण्टी-थेफ्ट अलार्म असलेली ॲम्पियर मॅग्नस ईएम्स वैशिष्ट्य-संपन्न इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये प्रतितास 55 किमीच्या अव्वल गतीपर्यंत पोहोचण्यासाठी 1.2 केडब्ल्यू मोटर आहे, तसेच 60 व्होल्ट, 30 एएच बॅटरी आहे, जी 5 ॲम्पियन सॉकेटच्या माध्यमातून 6 ते 7 तासांमध्ये 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. मॅग्नस ईएम्समध्ये 121 किमीची प्रभावी एआरएआय-प्रमाणित रेंज आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर व्ही2 मध्ये शक्तिशाली व वॉटरप्रूफ मोटर आहे आणि या स्कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्टमसह तुम्ही पॉवर कमी होण्याची चिंता न करता लांबच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. लिथियम-आयन बॅटरी तीन ते चार तासांमध्ये संपूर्ण चार्ज होण्याची खात्री देते आणि 75 किमीची रेंज देते. या स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स आणि मोठे बूट स्पेस आहे, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे व सुलभपणे तुमचे सामान स्टोअर करू शकता. याव्यतिरिक्त ॲण्टी-थेफ्ट लॉक स्कूटर वापरात नसताना सुरक्षित असण्याची खात्री देते.
इलेक्ट्रिक स्कूटर व्ही2 आरामदायी व विश्वसनीय राइड देते. रॅडियण्ट रेड, पेस्टल पीच, सफायर ब्ल्यू, पिस्ता, पर्ल व्हाइट व कोर्बान ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध ही स्कूटर निश्चितच रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : 14 मे ते 20 मे 2023, तूळ राशीला राजकारणात यश मिळविण्याच्या संधी मिळू शकतात; वाचा हा आठवडा कसा जाईल https://www.navarashtra.com/lifestyle/weekly-horoscope-14-may-to-20-may-2023-libra-may-get-opportunities-to-achieve-success-in-politics-how-this-week-will-go-read-saptahik-rashibhavishya-in-marathi-nrvb-398985/”]
हिरो इलेक्ट्रिक फोटॉन 1200 वॅट मोटरसह 72 व्होल्ट 26 एएच बॅटरी पॅकसह येते. बॅटरी ५ तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज असता 90 किमीची रेंज देते. या इलेक्ट्रिक स्कूटरची प्रतितास 45 किमीची अव्वल गती आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स व टेल लाइट्स, तसेच स्लीक अलॉई व्हील्स आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर्स प्रवास करण्यासाठी पर्यावरणास-अनुकूल व सोईस्कर आहेत आणि बाहेर फेरफटका मारण्यााची आवड असलेल्या किंवा परिवहनासाठी सोईस्कर साधनाची गरज असलेल्या मातांसाठी सर्वोत्तम गिफ्ट आहेत. या लेखामध्ये आम्ही किफायतशीरपासून उच्चस्तरीय पर्यायांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सची माहिती दिली आहे. बाऊंस इन्फिनिटी ई1, हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स, ॲम्पियर मॅग्नस ईएक्स, ओडिसी रेसर लाइट व्ही आणि हिरो इलेक्ट्रिक फोटॉन या सर्व सर्वोत्तम निवडी आहेत, ज्या विविध वैशिष्ट्ये व किंमतीसह सादर करण्यात आल्या आहेत. तुमच्या आईला इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट देत तुम्ही तिच्याप्रती तुमचे प्रेम व कौतुक व्यक्त करण्यासोबत तिला आरामदायीपणे प्रवास करण्यामध्ये मदत देखील करू शकता.