Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईक मेंटेनन्ससाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स, होईल पैश्याची बचत आणि मायलेजही वाढेल

आपल्या बाईकची काळजी घेणं खूप गरजेचं असते. जर आपण बाईकची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचा बाईकच्या परफॉर्मन्स आणि मायलेजवरही परिणाम होतो. त्यामुळेच बाईक मेंटेनन्सदरम्यान या 5 टिप्सबद्दल माहित असणे गरजेचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 20, 2024 | 05:49 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची बाईक घेणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण जेव्हा हे स्वप्न पूर्ण होतं तेव्हा आपल्याला समजते की बाके विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन करणे फार कठीण असते. बाईक नवीन असताना एवढी समस्या येत नाही पण नंतर ती जुनी झाल्यावर अनेक समस्या उद्भवू लागतात. खरंतर आजच्या युगात बाईक आपली गरज बनली आहे. यामुळेच कित्येक जण बाईक घेऊन तर बसतात पण तिला हवे तसे मेंटेन करत नाही. ज्यामुळे बाईक लवकर खराब होते. यामुळेच तुम्ही तुमची बाईक मेंटेन कशी करावी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

चेन लुब्रिकेशन

बाईकची चेन नियमितपणे तपासत रहा. बाईक जसजशी जुनी होत जाते तसतसे तिच्या चेन सेटमधून आवाज येऊ लागतो. त्यामुळे चेन गंजून खराब होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर बाईक सतत चालत राहिल्याने चेनही सैल होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही बाईक चिखलात चालवणार असाल तर ती चालवून झाल्यावर त्याची साखळी साफ करून ठेवा.

हे देखील वाचा: स्टयलिश लूक असणारी बाईक शोधताय? Yamaha कडून नवीन एडिशन मध्ये R15 आणि MT-15 लाँच

ब्रेक आणि क्लच

ब्रेक आणि क्लच हे बाईकचे अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. सतत वापराने ते सैल होतात. जेव्हा तुमच्या बाईकमधील ब्रेक आवाज करू लागतात किंवा क्लच पूर्णपणे सोडल्यानंतर बाईक वेग पकडण्यासाठी खूप वेळ घेत असेल तर तेव्हा लगेच तुमच्या मेकॅनिकशी संपर्क साधा.

इंजिन

बाईकचे इंजिन ऑइल नियमितपणे तपासत चला. खूप जुने ऑइल इंजिनचे अन्य पार्टस खराब करू शकते. यामुळे तुमच्या बाईक सर्व्हिसिंगचा खर्चही वाढेल. जर तुम्ही तुमची बाईक खूप वापरात असाल तर तिची योग्य वेळी सर्व्हिस करून घ्या आणि इंजिन ऑइल देखील बदलून घ्या. खराब इंजिन ऑइलमुळे बाईकच्या मायलेज वरही परिणाम होतो.

एअर फिल्टर आणि टायर

बाईकमध्ये एअर फिल्टर असते, ज्याच्या मदतीने इंजिन सुरळीतपणे काम करते. नियमित बाईक चालवल्यामुळे त्यात माती साचू शकते. अशा परिस्थितीत आपण त्याची नियमित स्वच्छता करत राहायला हवी. तुम्ही बाईक सर्व्हिसिंगच्या वेळी एअर फिल्टर बदलू शकता. याशिवाय बाईकच्या टायरमध्ये पुरेशी हवा भरून घ्या. कमी आणि जास्त हवेचा दाब बाईकच्या मायलेजवर परिणाम करतो.

स्पार्क प्लग

बाईकच्या स्पार्क प्लगमुळे होणाऱ्या समस्यांकडे लोकं जास्त लक्ष देताना दिसत नाही. या कारणामुळे अनेकवेळा बाईक नीट सुरू होत नाही. त्यामुळे, 1500-2000 किलोमीटर बाईक चालली की तिचे स्पार्क प्लग बदलणे महत्त्वाचे असते. तसेच, वेळोवेळी, आपण स्वत: ते उघडू शकता, कापडाने स्वच्छ करू शकता आणि बाइकमध्ये परत फिट करू शकता.

Web Title: 5 best tips for bike maintenance which will save your money and will increase bike mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 05:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.