भारताच्या ७७व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, ओबेन इलेक्ट्रिक या परफॉर्मन्स इलेक्ट्रिक बाईकच्या भारतीय ब्रँडने ‘फ्रीडम ऑफर’ ची घोषणा आज केली आहे. संपूर्णपणे भारतीय, संपूर्णपणे इलेक्ट्रिक ओबेन रोरवर तब्बल २५,००० रुपयांची विशेष सूट दिली जात आहे. ओबेन रोरची मूळ किंमत १,४९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे, आता ग्राहकांना ही फ्लॅगशिप बाईक फक्त १,२४,९९९ रुपये या विशेष एक्स-शोरूम किमतीला विकत घेता येणार आहे. मर्यादित काळासाठीची ही ऑफर १५ ऑगस्टपर्यंत देशभरातील सर्व ओबेन इलेक्ट्रिक शोरूम्समध्ये उपलब्ध राहील. अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आकर्षक किमतीमध्ये लाभ घेण्याची अतुलनीय संधी ग्राहकांना उपलब्ध करवून देण्यात आली आहे.
ओबेन इलेक्ट्रिकने देशाचा स्वातंत्र्यदिन या विशेष ऑफरसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे. आपल्या ग्राहकांना प्रदूषण, इंधनाचा महागडा खर्च आणि देखभालीचा त्रास यावर पर्याय म्हणून ओबेन रोर ही बाईक मार्केटमध्ये आणली. भारतीय ब्रँड ओबेन इलेक्ट्रिकने नावीन्य व आपल्या देशाचा भक्कम निर्धार यांचे प्रतीक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ओबेन रोर ही त्यांची फ्लॅगशिप बाईक, भारतात डिझाईन, विकसित करून, इथेच तयार केली गेली आहे. ‘मेक इन इंडिया’ चे प्रभावी प्रतीक असलेली ओबेन रोर देशाची प्रगती आणि अधिक स्वच्छ व अधिक हरित भविष्यासाठी महत्व अधोरेखित करते. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिली जात असलेली ही ऑफर ओबेन इलेक्ट्रिकची पर्यावरणस्नेही मोबिलिटीला चालना देते. इतकेच नव्हे तर, ग्राहकांनी स्वदेशी तंत्रज्ञान उत्कृष्टतेला स्वीकारावे यासाठी प्रोत्साहन मिळते.
ओबेन रोरची वैशिष्ट्ये
ओबेन रोर अवघ्या तीन सेकंदांमध्ये ० ते ४० किमी प्रति तास इतके ऍक्सिलरेट करू शकते, याची ८ किलोवॅट मोटर १०० किमी प्रति तास इतका कमाल वेग देऊ शकते. यातील अत्याधुनिक लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी तंत्रज्ञान (बाजारपेठेतील पहिले) याचा जीवनकाल दुपटीने वाढवते, ५०% जास्त हीट रेसिस्टन्स देते आणि पारंपरिक आयसीई मोटरसायकल व इतर ईव्हीच्या तुलनेत पर्यावरणावर खूपच कमी प्रभाव निर्माण करते.ओबेन इलेक्ट्रिकचे एलएफपी तंत्रज्ञान रोरची कामगिरी वाढवते, इतकेच नव्हे तर, पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या कोबाल्ट आणि निकेल खाणींची गरज देखील संपवते.