याला म्हणतात सेल! Flipkart Big Billions Days वर 'या' कंपनीजकडून मिळणार बाईक आणि स्कूटरवर आकर्षक डिस्काउंट
लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. या काळात अनेक कंपनीज आपल्या उत्पादनावर आकर्षित डिस्कॉउंट्स उपलब्ध करून देतात. तसेच हा काळ चालू होण्याअगोदर अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्स विशेष सेल जाहीर करत असतात. यातीलच एक सर्वांच्या ओळखीची सेल म्हणजे फ्लिपकार्टची बिग बिलियन डेज. या सेलमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स दमदार डिसॉकन्ट्स पाहायला मिळतात.
यंदाची फ्लिपकार्टची सेल ही थोडी विशेष असणार आहे. कारण यंदा बिग बिलियन डेज सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांसोबतच अनेक दुचाकींवरही उत्तम ऑफर्स देण्यात येणार आहेत. Flipkart ची ही सेल देशातील 12,000 हून अधिक पिन कोड आणि 700 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध असेल, जिथे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या जातील.
हे देखील वाचा:Mahindra Thar Roxx 4×4 चे लॉंचिंग! जाणून घ्या कारची किंमत, वैशिष्ट्ये
Hero, Bajaj, TVS, Ola, Chetak, Jawa, Yazdi, Vida, Athar सारख्या मोठ्या ब्रँडच्या दुचाकी Flipkart वर उपलब्ध असतील. यामध्ये कम्युटर बाईक्स, प्रीमियम स्पोर्ट्स बाईक्स आणि पेट्रोल इंजिन स्कूटर तसेच इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश असेल. फ्लिपकार्टच्या मते, ग्राहक येथून कमी-स्पीड इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकतात, ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसेल. या सेलमध्ये हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर देखील उपलब्ध असतील.
या सेलमध्ये, ग्राहकांना केवळ आकर्षक सवलत मिळणार नाही, तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक, इतर बँकांकडून स्पेशल डील्स आणि Supercoins द्वारे लॉयल्टी फायदे देखील मिळतील. याचा अर्थ, या सेलमध्ये फक्त उत्पादनांची किंमत कमी होणार नाही, तर उत्कृष्ट पेमेंट आणि फायनान्सिंग पर्याय देखील उपलब्ध असेल.
गेल्या वर्षी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये अनेक मोठ्या मॉडेल्सवर सूट देण्यात आली होती. Hero Super Splendor XTEC ची किंमत ₹ 81,005 होती, तर विक्रीमध्ये ही बाईक फक्त 70,005 रुपयात मध्ये उपलब्ध होती. त्याचप्रमाणे, Hero Extreme ची किंमत 1,20,806 रुपयात होती, जी विक्रीमध्ये 1,07,806 रुपयापर्यंत कमी करण्यात आली होती.
याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवरती सुद्धा सूट देण्यात आली होती. ओकाया फास्ट F4 ची किंमत 1,32,900 वरून 1,17,990 रुपयांपर्यंत कमी केली होती. Ampere Magnus जे 1,04,900 रुपयाला विकली जात होती, ती 90,155 रुपयात उपलब्ध होती.