फोटो सौजन्य: Social Media
प्रत्येक बाईकस्वारासाठी हेल्मेट हे खूप महत्वाचे आहे. अशावेळी तुम्ही एक उत्तम आणि उच्च दर्जाचे हेल्मेट निवडणे गरजेचे आहे. बारात आपल्याला असे अनेक हेल्मेट पाहायला मिळतील जे कमी किंमतीत उपलब्ध असतात. परंतु ते वापरण्यायोग्य नसतात. अशाप्रकारचे हेल्मेट वापरल्याने तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्यामुळेच एक उच्च दर्जाचे आणि सुरक्षित हेल्मेट वापरणे खूप महत्वाचे आहे.
जर तुम्ही सुद्धा एका आकर्षित आणि कमी किंमतीत सुरक्षित हेल्मेट घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकतेच बाजारात स्टीलबर्ड कंपनीने आपले नवीन हेल्मेट SBH-35 ROBOT 2.0 लाँच केले आहे. या हेल्मेटची किंमत तुमच्या नेटफ्लिक्सच्या वार्षिक सब्स्क्रिप्शनपेक्षा कमी आहे. हे हेल्मेट खास अशा रायडर्ससाठी आणले आहे ज्यांना सुरक्षेसोबतच स्टाइल सुद्धा आवडते. चला या हेल्मटमध्ये असे काय विशेषपण आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
कंपनीने हे हेल्मेट बनवताना मल्टी लेयर ईपीएस (थर्मोकोल) वापरले आहे, ज्यामध्ये हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी हे दोन्ही स्तर आहेत. याव्यतिरिक्त, या हेल्मेटमध्ये एअर चॅनेल आहेत जे हवेचा प्रवाह राखतात आणि राइड दरम्यान थंडपणा आणि आराम देतात. वॉशेबल इंटीरियरसोबतच यात पॉली कार्बोनेट अँटी स्क्रॅच व्हिझर देण्यात आला आहे.
सुरक्षितता वाढवण्यासाठी, नोज प्रोटेक्टर आणि विंड डिफ्लेक्टर देखील प्रदान केले आहे. जे हाय स्पीडवर चालवताना अतिरिक्त सुरक्षा आणि आराम देते. हेल्मेटमध्ये द्रुत-रिलीज व्हिझर यंत्रणा आणि व्हिझर लॉकिंग सिस्टम देखील आहे, ज्यामुळे व्हिझर सहज बदलता आणि सुरक्षित करता येतो. युरोपियन देशांच्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यासाठी, त्यास मायक्रो-मेट्रिक बकल देखील दिले गेले आहे.
हे देखील वाचा:डिझेल कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात?जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान
हे हेल्मेट कंपनीने अतिशय सुरक्षितपणे बनवले आहे. हे DOT (FMVSS क्रमांक 218) आणि BIS (IS 4151:2015) सेफ्टी नॉर्म्सवर प्रमाणित आहे. यामुळे रायडरला एक सुरक्षित राईडची अनुभूती मिळते.
SBH-35 ROBOT 2.0 हेल्मेट स्टीलबर्डने 1799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले आहे, जी नक्कीच सर्वसामान्यांसाठी परवडणारी किंमत आहे. हे नवीन हेल्मेट स्टीलबर्डने अनेक रंग आणि साइझमध्ये आणले आहे. यामध्ये तीन आकार देण्यात आले आहेत, ज्यात 580mm, 600mm आणि 620mm यांचा समावेश आहे.