फोटो सौजन्य: YouTube
ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू८ च्या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू८ मध्ये डायनॅमिक स्पोर्टीनेस आणि सुधारित आकर्षकतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जेथे प्रत्येक वैशिष्ट्यामधून आकर्षकता व शक्ती दिसून येते. नवीन ऑडी क्यू८ भारतात 1.17 रूपये (एक्स–शोरूम) या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
नवीन ऑडी क्यू८ च्या लाँच व्यतिरिक्त, ऑडी इंडियाने भारतात विक्रीचा चांगला टप्पा गाठला आहे. कंपनीने फक्त पंधरा वर्षांमध्ये एक लाख कार्सची विक्री केली आहे. हा क्षण साजरा करण्यासाठी ब्रँडने ऑडी ग्राहकांसाठी 100 डे सेलिब्रेशन बेनीफिट सादर केले आहे, ज्यामध्ये कोणत्याही खरेदीवर लॉयल्टी फायदे, सर्विस प्लॅन्स, एक्स्टेण्डेड वॉरंटी, ऑडी जेन्यूएन अॅक्सेसरीज, ऑडी जेन्यूएन मर्चंडाइज व कलेक्शन्स आणि आकर्षक कॉर्पोरेट व ट्रेड-इन फायद्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा: या दमदार फीचर्ससह लाँच झाली TVS Jupiter 110, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही