फोटो सौजन्य: Freepik
ज्याप्रमाणे भारतात वाहनांची विक्री केली जात आहे त्याचप्रमाणे अनेक अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी आपण वाहतूक नियमांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम न पाळल्यास चालान आणि काही प्रकरणांमध्ये लायसन्स सुद्धा जप्त केला जाऊ शकतो.
अशा वेळी वाहतुकीच्या नियमांबाबत थोडी निष्काळजीपणामुळे तुम्हाला मोठे परिणाम भोगावे लागू शकतात. आज आपण अशाच काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे पालन न केल्यास तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकतो.
वाहन चालवताना फोन वापरणे पूर्णपणे चुकीचे आणि तुमच्या आयुष्यासाठी धोक्याचे आहे. कायद्यानुसार, तुम्ही वाहन थांबवून नेव्हिगेशनचा वापर करू शकता. पण जर तुम्ही फोनचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी करताना दिसल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच काही केसेसमध्ये तुमचे लायसन्स जप्त सुद्धा होऊ शकते.
पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्रॉसिंग बनवण्यात आले आहेत. आपण अनेकदा पाहतो की काही कारचालक लाल ट्रॅफिक सिग्नल चालू असताना सुद्धा झेब्रा क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न करतात.
मोटार वाहन कायद्याच्या नियमानुसार लाग सिग्नल चालू असताना तुमचे वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबवावे. हे नियम मोडणाऱ्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते, एवढेच नाही तर वाहतूक पोलिसांना हवे असल्यास त्यांचा परवानाही जप्त केला जाऊ शकतो.
तुम्ही शाळा किंवा हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर तुमच्या वाहनाचा वेग कमी ठेवा. अशा ठिकाणी अतिवेगाने वाहन चालवण्यास कायद्याने बंदी आहे. तसेच तुम्हाला बहुतांश वेगमर्यादेचे फलकही या ठिकाणी दिसतील. अशा जागी वाहन चालवताना त्याची वेग ताशी 25 किमीपेक्षा जास्त नसावी. या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला दंड आकाराला जाऊ शकतो. तसेच तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त केले जाऊ शकते.
वाहन चालवताना खिडक्या उघड्या ठेवून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे देखील नियमांचे उल्लंघन करण्याच्या यादीत येते. तुम्ही असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो व तुमचा परवानाही जप्त केला जाऊ शकतो. हल्ली अनेक नवीन बाईक्स आणि स्कुटरमध्ये सुद्धा गाणी ऐकण्याचे फिचर देण्यात आले आहेत. हा नियम या दुचाकींना सुद्धा लागू होतो.
आजकाल बहुतेक लोकांच्या कारमध्ये तसेच बाइकमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा असते. अशा परिस्थितीत चालक ड्रायव्हिंग करताना ब्लूटूथवरून कॉल रिसिव्ह करतात, परंतु असे करणे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या चुकीमुळे तुम्हाला दंड तर भरावा लागेलच पण याशिवाय तुमचे लायसन्स सुद्धा जप्त होईल.