फोटो सौजन्य: Social Media
2024 चे वर्ष अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी गाजवले. त्यात आवर्जून नाव घेतले पाहिजे ते बजाज कंपनीचे. याचे कारण म्हणजे त्यांनी मार्केटमध्ये आणलेली जगातील पहिली CNG बाईक. Bajaj Freedom 125 असे या सीएनजी बाईकचे नाव होते. ही बाईक मार्केटमध्ये येताच सुपरहिट झाली होती. याव्यतिरिक्त कंपनीने बजाज चेतकचा इलेक्ट्रिक मॉडेल सुद्धा मार्केटमध्ये आणले.
आता 2025 मध्ये बजाज कंपनीकडून ग्राहकांच्या अनेक अपेक्षा आहे. पण आता कंपनीने नवोन वर्षात काही बाईक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाईक्स 110cc, 125cc आणि 250cc च्या आहेत, ज्या Pulsar F250, CT 125X आणि Platina 110 ABS आहेत. भारतात या बाईक्स बंद करणे हे बजाजसाठी एक मोठे धोरणात्मक बदल आहे. यासोबतच या बाईकच्या विक्री आणि उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात. या बाईक्स बंद होण्यामागचे कारण काय आहे, याबद्दल जाणून घेऊया.
जानेवारीत आयोजित केलेला Bharat Mobility 2025 कुठे, केव्हा, कधी होणार? जाणून घ्या याची पूर्ण माहिती
हे 249.07cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन वापरते, जे 24.5 hp आणि 21.5 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. यात ट्रिपल-युनिट डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी हेडलाइट आणि मागील टेललाइट देण्यात आला होता. यात टेलीस्कोपिक फ्रंट आणि सस्पेंशन म्हणून मोनोशॉक रिअर देण्यात आले होते. यात एबीएस आणि रियर डिस्क ब्रेक देखील देण्यात आले होते.
ही एक कम्युटर बाईक आहे, जी दमदार परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत ऑफर करते. हे 124.4cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरते. यामध्ये बसवलेले इंजिन 10.9 हॉर्स पॉवर आणि 11 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात ब्लॅक अलॉय व्हील्स, रियर टेल रॅक आणि आरामदायी सीट्स देण्यात आल्या होत्या. तसेच यात ड्युअल टोन पेंट स्कीम आणि स्टायलिश ग्राफिक्स देण्यात आले होते.
जुनी किंमत विसरा ! आता Citroen Basalt खरेदी करणे झाले अजूनच महाग, कंपनीने ‘इतकी’ वाढवली किंमत
ही एक कम्यूटर बाईक होती जी ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह आली होती. यात 115.45cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन वापरले, ज्याने 8.6 हॉर्सपॉवर आणि 9.81 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट केला. बाईकचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट आणि ड्युअल-स्प्रिंग रिअर शॉक ऍब्जॉर्बर्स देण्यात आले होते.
बजाजच्या या तीन बाईक बंद होण्यामागे त्यांची विक्री नसणे हेच कारण सध्या तरी मानले जात आहे. Pulsar F250, CT 125X, आणि Platina 110 ABS ला लोकांकडून तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही जितका अपेक्षित होता. याव्यतिरिक्त, ABS व्हेरियंटची किंमत देखील या सेगमेंटमधील इतर बाईक्सपेक्षा जास्त होती, ज्यामुळे विक्रीवर परिणाम होत होता. यामुळे कंपनीने या बाईक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.