फोटो सौजन्य: Pinterest
ही नवीन बाईक खास भारतीय कर (टॅक्स) नियम लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. 350cc पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक्सवर जास्त कर लागतो, तर 350cc पेक्षा कमी इंजिनवर कमी कर आकारला जातो. त्यामुळे कंपनीने इंजिनची क्षमता थोडी कमी केली आहे.
नवीन Pulsar NS400Z मध्ये आता 349.13cc इंजिन देण्यात आले आहे, जे आधी 373cc होते. या बदलामुळे बाईकची किंमत थोडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, इंजिन छोटं झाल्यामुळे पॉवरमध्ये किंचित घट झाली आहे.
नवीन मॉडेल: 40.6 PS पॉवर आणि 33.2 Nm टॉर्क
जुने मॉडेल: 43 PS पॉवर आणि 35 Nm टॉर्क
परफॉर्मन्समध्ये मोठा फरक नसला तरी थोडा बदल जाणवू शकतो. तरीही बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर क्लच आणि इलेक्ट्रॉनिक थ्रॉटलसारखे फीचर्स मिळतात.
तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर
नवीन Pulsar NS400Z च्या डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. लूक, कलर ऑप्शन आणि स्टाइल जवळपास पूर्वीसारखेच आहेत. फक्त इंजिनवर 373cc ची मार्किंग काढून टाकण्यात आली आहे.
फीचर्समध्ये 43mm USD फ्रंट फोर्क्स, ड्युअल चॅनल ऍब्स, मोठे डिस्क ब्रेक, रुंद टायर्स, प्रोजेक्टर हेडलाईट, अॅडजस्टेबल लीव्हर्स, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनचा समावेश आहे.
कंपनीने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. मात्र बाईक शोरूममध्ये पोहोचत असल्याने ती लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. ही बाईक आपल्या सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करू शकते.






