फोटो सौजन्य: Social Media
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नवनवीन गोष्टी खरेदी करत असतात. काही जण कपडे खरेदी करतात तर काही नवी सुरुवात म्हणून स्वतःचा व्यवसाय या शुभ काळात चालू करताना दिसतात. दिवाळीत अनेक जण नवीन कार किंवा बाईक सुद्धा विकत घेताना दिसतात. ऑटो कंपनीज सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत असतात.
नवीन कार विकत घेताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्यातही अनेक कार उत्पादक कंपनीजच्या कार मार्केटमध्ये असल्यामुळे नेमकी कोणती कार विकत घ्यावी हा प्रश्न नेहमीच कार खरेदीदारांना सतावत असतो. जर तुमच्या कुटुंबात फक्त चारच जण असेल तर निर्णय पटकन घेता येऊ शकतो. पण जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर मग प्रत्येकाची आवड निवड पाहणे गरजेचे असते.
हे देखील वाचा: Kia Carnival विकत घेण्यासाठी किती असावा पगार? जाणून घ्या EMI चं पूर्ण गणित
दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. आज आपण अशा 7 सीटर कारबद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्ही फक्त 6 लाख रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणू शकता. या कारच्या आतील स्पेस इतके मोठे आहे की तुमचे कुटुंब त्यात पूर्णपणे बसेल.
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत तिचे नाव Renault Triber असे आहे, जी एक उत्कृष्ट मल्टी पर्पज व्हेइकल (MPV) आहे. ही कार एका मोठ्या कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. चला या कारच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Renault Triber ची किंमत 5 लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होते. कमी बजेटमध्ये येत असलेल्या या 7 सीटर कारमध्ये उत्कृष्ट फीचर्स आहेत. ही कार 1.0-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते जी 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 14-इंच फ्लेक्स व्हील आहे. यात पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल-टोन डॅशबोर्ड, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसाठी सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, संपूर्ण डिजिटल व्हाइट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रोम रिंगसह एचव्हीएसी नॉब्ससह नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ब्लॅक इनर डोअर हँडल सारखे फीचर्स पाहायला मिळतात.
याशिवाय ट्रायबर कारमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, सिक्स-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, स्टीयरिंगवरील ऑडिओ कंट्रोल यांसारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. कारच्या मॅन्युअल व्हेरियंटसह 19 kmpl पर्यंत मायलेज मिळू शकते. ही MPV कार एकूण 10 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही कार 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस आहे.