फोटो सौजन्य: Social Media
दिवाळीच सण म्हंटलं, अनेकांना आठवते ती रोषणाई, घरचा फराळ आणि चैतन्यमय वातावरण. या शुभ काळात अनेक जण आपल्या नातेवाईकांना भेटतात, त्यांच्यासाठी मिठाई आणि अन्य भेटवस्तू घेऊन जातात. तसेच हा दिवाळीत नवीन कार किंवा बाईक घेऊन नवी सुरुवात करत असतात.
Kia Carnival नुकतेच भारतात लाँच झाली आहे. ही नवीन जनरेशन कार्निव्हल प्रीमियम लाँच होताच लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, महागड्या किंमतीमुळे ही कार फक्त श्रीमंत व्यक्तीच घेऊ शकतात. जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर आज आपण जाणून घेऊया की तुमचा पगार किती असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांपासून वाहनांचे कसे कराल संरक्षण? दुर्लक्ष केल्यास उडेल आगीचा भडका
भारतीय बाजारपेठेत, नवीन Kia कार्निव्हल लिमोझिन प्लस या एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 63 लाख 90 हजार रुपये आहे. त्याच्या ऑन-रोड किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत त्याची किंमत 75 लाख 60 हजार रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
आता डाउन पेमेंट आणि ईएमआयवर ही लक्झरी कशी खरेदी करायची याबद्दल जाणून घेऊया? जर तुम्ही ही कार दिल्लीत 11.72 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करत असाल तर तुम्हाला बँकेकडून 63.88 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. जेव्हा तुमच्या कर्जाच्या रकमेवर 8% व्याजदर आकारला जाईल, तेव्हा या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्हाला दरमहा किमान 1 लाख 29 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
हे देखील वाचा: TVS iQube साठी 10 हजारांचे डाऊन पेमेंट केल्यास भरावा लागेल फक्त ‘इतका’ EMI?
अशाप्रकारे, तुम्हाला 5 वर्षात बँकेला एकूण 15 लाख 69 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला एकूण 83 लाख 61 हजार रुपये बँकेत भरावे लागतील. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्ज आणि व्याजदर कितीही असतील, ते तुमच्या व्याजदरावर आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतात. तुम्ही किया कार्निवल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा किमान पगार किमान 3 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असला पाहिजे.