फोटो सौजन्य: iStock
नववर्ष सुरू होण्यास आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. येणाऱ्या 2025 मध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या आगामी आणि आधुनिक कार्स मार्केटमध्ये लाँच करण्यास सज्ज झाल्या आहेत. पण 2024 वर्ष देखील भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी उत्तम ठरले.
अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांसोबत नवे प्रयोग केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2024 मध्ये लाँच झालेली बजाजची Freedom 125. ही बाईक विशेष असण्याचे कारण म्हणजे ही जगातील पहिली सीएनजी बाईक आहे. याव्यतिरिक्त, Ola Electric ने सुद्धा इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आपल्या पहिल्या वहिल्या बाईक लाँच केल्या होत्या.
2024 मध्ये अनेक उत्तम कार्स लाँच तर झाल्याच पण जुन्या असणाऱ्या कार्सने देखील ग्राहकांना भुरळ पाडली आहे . चला 2024 मधील बेस्ट कार्सबद्दल जाणून घेऊया.
टाटा मोटर्स उत्तरप्रदेशच्या गावांना शहरांशी जोडणार; मिळाली ३,५०० हून अधिक बसेसची ऑर्डर
नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट याच वर्षी लाँच झाली होती. कंपनीने ही अपडेटेड कार अनेक नवीन फीचर्ससह मार्केटमध्ये दाखल केली होती. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ही कार मार्केटमध्ये 6.49 लाखात लाँच झाली आहे. ही कार नऊ आकर्षक रंगात उपलब्ध आहे.
नवीन स्विफ्टमध्ये 1.2 लिटर, तीन-सिलेंडर झेड सीरीज इंजिन, 9-इंच टचस्क्रीन, सुधारित क्लायमेट कंट्रोल पॅनेल आणि अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) सारखी सेफ्टी फीचर्स देखील आहेत.
महिंद्राची थार रॉक्स 15 ऑगस्ट 2024 रोजी लाँच झाली होती. ही थार दिसण्यात जेवढी क्लासी आहे तितकीच परफॉर्मन्समध्ये सुद्धा पॉवरफुल आहे. या कारमध्ये सेफ्टीबरोबरच अत्याधुनिक फीचर्स सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे. या कारचे बेस मॉडेल 12.99 लाखांपासून सुरु होते. ही कार लाँच होताच ग्राहकांनी त्याच्या बुकिंगसाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या Bullet 350 साठी किती असेल EMI? ‘एवढे’ करावे लागेल डाउन पेमेंट
टाटा मोटर्सची नेक्सॉन कार ही अनेक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारचा इलेक्ट्रिक व्हेरियंट ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. या कारची किंमत 8 ते 15.8 लाखांदरम्यान असू शकते. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू देखील शकते.
नुकतेच होंडा अमेझ 4 डिसेंबर 2024 ला लाँच झाली होती. ही कार कंपनीची अमेझ सेगमेंटमधील तिसरी जनरेशन कार आहे. या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे. या कारची किंमत 8 ते 11 लाखादरम्यान आहे.
महिंद्राच्या एसयूव्ही कार्स मार्केटमध्ये खूपच लोकप्रिय आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 700 ही त्यातीलच एक उत्तम कार आहे. या कारची किंमत 3.99–26.04 लाखांदरम्यान असू शकते.