फोटो सौजन्य: iSotck
आपली स्वतःची बाईक असावी हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. बजेट फ्रेंडली बाईक्स तर मार्केटमध्ये असतातच पण खऱ्या अर्थाने भाव खातात त्या स्टायलिश लूक असणाऱ्या बाईक्स. देशात अनेक अशा दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत ज्यांची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते. त्यातीलच एक कंपनी म्हणजे रॉयल एन्फिल्ड.
रॉयल एन्फिल्डच्या बाईक्स आज प्रत्येक तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. अनेक जण कंपनीच्या बाईक्सना बुलेट म्हणून संबोधत असतात. या बुलेट बाईक्स चालवण्यात तरुणाईला एक वेगळाच फील येत असतो.
Royal Enfield Bullet 350 ही भारतातील लोकांची सर्वात आवडती बाईक आहे. या बाईकची क्रेझ तरुणांबरोबरच ज्येष्ठांमध्येही दिसून येत आहे. ही बाईक भारतीय लष्करातही वापरली गेली आहे. ब्रिटीश ऑटोमेकर्सच्या या बाईकची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु प्रत्येकजण पूर्ण पैसे देऊन ही बाईक खरेदी करू शकत नाही. तेव्हा मग ते EMI सुविधेचा वापर करतात.
Bharat Mobility 2025 मध्ये Tata ची ‘ही’ खास कार होऊ शकते लाँच, जाणून घ्या किंमत
जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही ती EMI वर देखील खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या खिशातून एकाच वेळी मोठी रक्कम जाण्याऐवजी हळूहळू काही हजार रुपये खर्च होतील आणि ही बाईक कायमची तुमची राहील. चला जाणून घेऊया बुलेट 350 खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट भरून ईएमआय भरावा लागेल.
Royal Enfield Bullet 350 च्या बेस मॉडेलची राजधानी दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. देशातील इतर शहरांमध्ये या किंमतीत काही फरक दिसू शकतो. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून 1.90 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. तुम्हाला बँकेकडून मिळणारे कर्ज तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. या कर्जावर बँकेच्या धोरणानुसार व्याजही आकारले जाईल. या व्याजदरानुसार ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला EMI म्हणून बँकेत जमा करावी लागेल.