भारतातील मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशभरात ‘नेक्सा स्टुडिओ शोरूम’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने Nexa स्टुडिओ आउटलेट्स सादर केले आहेत जे विद्यमान Nexa शोरूमपेक्षा छोटे असणार आहेत. हे नेक्सा स्टुडिओ आउटलेट्सचे भारतातील टियर टू आणि टियर थ्री शहरांमध्ये असणार आहेत.
कंपनीचे आहेत 500 नेक्सा शोरुम्स
मारुती सुझुकीने सध्याच्या प्रिमियम कार शोरूम चेनसाठी एक लहान आउटलेट सादर केल्यामुळे, ‘Nexa’ हा ब्रँड अधिक जास्त लक्ष्यवेधी होणे अपेक्षित आहे. कंपनीचे यापूर्वीच भारतात 500 नेक्सा शोरूम्स असल्याचे उघड केले आहे आणि विशेष म्हणजे केवळ नऊ वर्षांत हा टप्पा गाठला आहे. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, अंदाजे. Nexa च्या एकूण विक्रीपैकी 32 टक्के विक्री टियर टू आणि टियर थ्री शहरांमधून होती. म्हणूनच कंपनीने या शहरांना प्राध्यान्य दिले आहे.
आर्थिक वर्षात 100 Nexa स्टुडिओ आउटलेट उभारणार
रोलआउट योजनेचा एक भाग म्हणून, मारुती 24-25 च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस छोट्या शहरांमध्ये 100 Nexa स्टुडिओ आउटलेट सुरू करू इच्छित आहे. दरम्यान, Nexa स्टुडिओ रोलआउटच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 30 शहरांचा समावेश असणार आहे. या स्टुडिओ आउटलेट्सद्वारे कार वापरकर्त्यांसाठी विक्री, सेवा तसेच अतिरिक्त सुविधा प्रदान केले जाईल. वापरकर्त्यांसाठी समर्पित वितरण क्षेत्रासह दोन-कार मॉडेल प्रदर्शन देखील असेल. या नवीन नेक्सा स्टुडिओ आउटलेट्सचा ग्राहक अनुभव मोठ्या नेक्सा शोरूम्स सारखाच असेल. कंपनीने नमूद केले आहे की, नेक्सा स्टुडिओ कंपनीच्या शहरात असलेल्या सध्याच्या एरिना आउटलेटचा केवळ नसून ते स्वतंत्र सेटअप असतील.
या Nexa शोरूममध्ये Baleno, Ignis, Fronx, XL6 MPV, Grand Vitara आणि Invicto या कार ऑफर केल्या जातात.
अलीकडे, Maruti Fronx ही भारतातून जपानमध्ये निर्यात केलेले मारुती सुझुकीचे दुसरे मॉडेल होते. 1600 हून अधिक मेड इन इंडिया कारची पहिली कंसाईन्मेट भारतामधून जपानाला पाठवली गेली होती. याबद्दल कंपनीने माहिती दिली आहे की, जपानमध्ये निर्यात केलेल्या मेड इन इंडिया फ्रॉन्क्सला सुझुकीची ऑलग्रिप सिलेक्ट AWD (All wheel Drive) टेक मिळते. ही पहिलीच वेळ आहे की कंपनी फ्रॉन्क्स युनिटमध्ये (निर्यात आवृत्ती) AWD टेक ऑफर करत आहे.