फोटो सौजन्य: Freepik
भारतीय ऑटोमोईबेल क्षेत्रात रोज नवनवीन आणि आकर्षित कार्स लाँच होत आहे. अनेक कंपनीज येणाऱ्या सणासुदीच्या मुहूर्तावर आपल्या आगामी कार्स लाँच करणार आहे. नुकतेच आपल्याला भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक वाहन उत्पादक कंपनीजने आपल्या आगामी कार्स लाँच केल्या. यात महिंद्रा कंपनीचा सुद्धा समावेश आहे.
महिंद्राने ऑगस्ट 2024 मध्येच भारतीय बाजारात Thar Roxx लाँच केली आहे. ही थार लाँच होताच अनेक जणांनी ही कार बुक करण्यासाठी आपली पसंती दर्शवली आहे. जर तुम्हाला सुद्धा थार रॉक्स विकत घेण्याचा विचार करत असाल पण त्याच वेळी दुसरा पर्याय सुद्धा शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला Thar Roxx च्या किंमतीत उपलब्ध असणाऱ्या तीन एसयूव्हीज बद्दल सांगणार आहोत. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
महिंद्रा थार रॉक्स भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट 2024 मध्येच लाँच करण्यात आली आहे. ही थार कंपनीने पाच दरवाजे असणारी थार म्हणून लाँच केली आहे. याआधी तीन दरवाजे असलेली थार लाँच करण्यात आली होती. फाइव्ह डोअर थार रॉक्सची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे. चला आता त्या तीन एसयूव्हीबद्दल जाणून घेऊया.
या कारची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीवर ऑफर केली जाते. यामध्येही थार रॉक्सप्रमाणेच पॅनोरॅमिक सनरूफ, एडीएएस सारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
उत्तम कारबद्दल आपण बोलतोय आणि टाटाची कार यात नाही असे होणे शक्य नाही. टाटा हॅरियर भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीकडून या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात सात एअरबॅग्ज, एडीएएस, पॅनोरामिक सनरूफ यांसारखे फिचर्स आहेत.
ब्रिटीश वाहन निर्माता JSW MG Hector देखील अतिशय चांगल्या पर्याय आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, ॲम्बियंट लाइटिंग, एडीएएस सारखी फीचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत. कंपनी 13.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.